🕒 1 min read
मुंबई : कोरोना व्हायरसवरील लसींच्या ड्राय रनचा दुसरा टप्पा आज (शुक्रवारी) देशात पार पडत आहे. उत्तर प्रदेश आणि हरियाणा वगळता देशातील सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील सर्व जिल्ह्यांमध्ये कोरोना लसीचं ड्राय रन पार पडणार आहे. केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार आज म्हणजेच 8 जानेवारी रोजी महाराष्ट्राच्या 30 जिल्हे आणि 25 महापालिका क्षेत्रांमध्ये आज कोरोना लसीकरणाचं ड्राय रन केलं जाणार आहे.
२ जानेवारीला पुणे, नंदुरबार, जालना, नागपूर या चार जिल्ह्यांत तसेच नागपूर व पिंपरी-चिंचवड या महानगरपालिका क्षेत्रात ही मोहीम राबविण्यात आली होती. केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार आज लसीकरणाची ड्राय रन घेतली जाणार आहे. या मोहिमेसाठी आवश्यक पूर्वतयारी करण्यात आली आहे. एका केंद्रावर २५ लाभार्थ्यांचं लसीकरण होणार आहे.
भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिनचा तिसरा टप्पा यशस्वी झाला आहे. पण याआधीच भारत बायोटेकच्या लसीला आपत्कालीन वापरासाठी परवानगी दिली आहे. आज भारतात लसीची दुसऱ्यांदा रंगीत तालीम होत आहे. तर या सर्व लसींच्या ट्रान्सपोर्टेशनलाही लवकरच सुरुवात होते आहे.
ड्राय रनचे उद्दिष्ट
क्षेत्रियस्तरावर कोवीन अॅप किती सोईस्कर व उपयोगी आहे हे तपासणे.
कोरोना लसीकरणाबतचे नियोजन, अंमलबजावणी तसेच अहवाल तयार करणे, या सर्व बाबींची पडताळणी/ तपासणी.
प्रत्यक्ष लसीकरण सुरु करण्यापूर्वी, लसीकरणाबाबतची आव्हाने व त्यानुसार मार्गदर्शक सुचना तयार करणे
लसीकरण मोहिमेतील सर्वस्तरावरील अधिकारी तसेच कर्मचारी यांचा आत्मविश्वास वाढविणे.
महत्वाच्या बातम्या
- #JEE_2021 : जेईई ऍडवान्सड परीक्षा ३ जुलैपासून; तर विद्यार्थ्यांना ‘हा’ मोठा दिलासा
- ‘जो निवडून येतो तो म्हणतो, दादा आम्ही तुमचे; आम्ही पण या म्हणतो आणि सत्कार करतो’
- पासपोर्ट जप्तीवर वडेट्टीवारांचा धक्कादायक खुलासा; म्हणाले, मी स्वतः ईडीकडे जाऊन…
- शिर्डी साई संस्थानच्या ‘त्या’ फलकाला भूमाता ब्रिगेडने फासलं काळं !
- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज पूर्व विदर्भाच्या दौऱ्यावर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
