🕒 1 min read
औरंगाबाद:- येत्या काही दिवसांत राज्यातील 5 महापालिकांसाठी निवडणुका जाहीर होणार आहेत. यामध्ये नवी मुंबई, औरंगाबाद, कल्याण डोंबिवली, वसई विरार आणि कोल्हापूर महापालिकेची निवडणूक होत आहे. त्यासाठी भाजपने रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. या निवडणुकांसाठी भाजपने हुकमी मोहरे निवडले आहेत.
नुकत्याच झालेल्या संघटनात्मक बैठकीमध्ये भाजपने महापालिका निवडणुकांसाठी रणनीती ठरवली. त्यानुसार आशिष शेलार यांना नवी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी प्रभारी म्हणून नियुक्त केलं आहे. तर गिरीश महाजन यांना औरंगाबादची जबाबदारी दिली आहे. त्यामुळे शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या औरंगाबाद जिंकण्याचं आव्हान महाजन यांच्यासमोर आहे.
औरंगाबाद महापालिका निवडणुकीसाठी निवडणूक प्रमुख म्हणून अतुल सावे तर निवडणूक प्रभारी म्हणून गिरीश महाजन यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आली आहे. निवडणूक संघटनात्मक जवाबदारी संभाजी पाटील निलंगेकर यांच्यावर असणार आहे.
दरम्यान, काँग्रेसने येथील निवडणुकीची सूत्रे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांच्याकडे दिली आहेत. काँग्रेस व शिवसेना यांच्यात सध्या औरंगाबादचे संभाजीनगर असे नामकरण करण्याबाबत धुसफूस सुरु आहे. काँग्रेस आणि शिवसेनमधील वादाचा फायदा गिरीश महाजन घेवून भाजपला घवघवीत यश मिळून देतात का हे पाहणे आता महत्वाचे ठरणार आहे.
महत्वाच्या बातम्या
- अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर मोदींची अर्थशास्त्रज्ञांसोबत बैठक
- ना मला, ना धड तुला, दे तिसऱ्याला… स्वबळावर अजित पवारांची प्रतिक्रिया
- ‘द काश्मीर फाइल्स’ चित्रपटाचे शूटिंग पुन्हा एकदा रद्द
- ‘बच्चन पांडे’ चित्रपटातील अक्षय कुमारचा किलर लुक व्हायरल
- राणा दाम्पत्य म्हणजे नाटक कंपनी; शिवसेनेच्या माजी खासदाराची घणाघाती टीका
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

