🕒 1 min read
कर्नाटक : लग्नाच्या दिवशीच लग्न मोडणे हि बाब खूप धक्कादायक आहे. मात्र, अशा संकटातून मार्ग काढत या संकटावर मात केल्याची घटना कर्नाटकात घडली आहे. मात्र, या धक्क्याने दोन्ही कुटुंबे सावरलेली नाही. या संकटावर मात करत आपल्या मुलीने मार्ग काढल्याचे समाधान मुलीच्या कुटुंबीयांनी व्यक्त केले आहे. लग्नाच्या दिवशीच नवऱ्याने मांडवातून प्रेयसीसोबत पोबारा केला. त्यामुळे तरुणीने लग्नासाठी आलेल्या एका वऱ्हाड्याशी लग्नगाठ बांधली.
कर्नाटकात चिकमंगलुरू जिल्ह्यातील तरिकेरे तालुक्यात ही घटना घडली आहे. अशोक आणि नवीन या दोन्ही भावांचे लग्न एकाच दिवशी होणार होते. नवीन आणि अशोकने लग्नापूर्वी होणारे सर्व विधी पूर्ण केले. नवीनने होणारी पत्नी सिंधू हिच्यासोबत लग्नाचे अनुष्ठानही पूर्ण केले. फक्त लग्नघटिकेची सर्वजण आतुरतेने वाट बघत होतो. त्याचवेळी नवीन लग्न मंडपातून अचानक गायब झाल्याचे समजले.
नवीन नेमका कुठे गेला, याचा तपास केला असता, तो त्याच्या प्रेयसीसोबत लग्न मंडपातूनच पळून गेल्याचे समजले. त्याच्या प्रेयसीने आपल्यासोबत आला नाहीस, तर तुझे लग्न मोडून समारंभातच सर्वासमोर विष घेत जीवन संपवण्याची धमकी नवीनला दिली होती. या धमकीने घाबरून नवीनने लग्न मंडपातूनच प्रेयसीसोबत पोबारा केल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे सिंधुसमोर मोठे संकट उभे ठाकले. तसेच दोन्ही कुटुंबांना मोठा धक्का बसला. तर अशोकचे लग्न लागल्यावर सिंधूने विचार करून मोठा निर्णय घेतला. लग्नासाठी आलेल्या वऱ्हाड्यांमधील सुयोग्य वर शोधून त्याच्याशी लग्न करण्याचे तिने ठरवले.
महत्वाच्या बातम्या
- राम मंदिरासाठी निधी संकलन करण्यास भाजपा कार्यकर्ते राज्यात घरोघर जाणार- पाटील
- ग्रामीण भागातील रस्ते आता दर्जेदार होणार; केंद्र सरकारशी सामजंस्य करारास मान्यता
- सौरव गांगुलीला हॉस्पिटलमधून मिळाला डिस्चार्ज
- राज्यातील 31 डिसेंबर 2020 पर्यंतची गुंठेवारी नियमित केली जाणार; सर्वसामान्यांना घरांसाठी होणार लाभ होणार लाभ
- वेगवान गोलंदाज नवदीप सैनीचं कसोटी मालिकेत पदार्पण
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
