नवी दिल्ली: सेबी म्हणजेच सिक्युरिटीज एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया ने ऑगस्ट महिन्यामध्ये व्यापारामध्ये अनुचित प्रकार केल्याप्रकरणी ७ संस्थांवर निर्बंध लागू केले होते. यामध्ये या संस्था भांडवली बाजारात व्यवहार करू शकत नव्हत्या.
मात्र आता या ७ संस्थांना दिलासा दिला आहे. कारण, सेबीने या संस्थांवरील निर्बंध उठविले आहेत. यामध्ये रिलायन्स सेक्युरिटीजसह इतर संस्थांचाही समावेश आहे.सेबीने ३० डिसेंबरला आदेशात म्हटले की, सध्या प्राथमिक दर्शनी कोणतीही सिक्युरिटीच्या बाजारात फसवणुकीची घटना दिसत नाही. त्यामुळे नियन करणाऱ्या संस्थेने ७ संस्थांवरील निर्बंध काढले आहेत.
याबाबत पुढील तपास सुरू असल्याचेही सेबीने म्हटले आहे. भारत सी पारेख, एचयूएफ, मानसी व्ही. शाह, प्रवीण सोमानी, बिमल एन. मेहता, जितेंद्र एम. शाह, एचयूएफ, संजय जे. शाह, एचयूएफ आणि शिमोनी एस. शाह या सात संस्थांचा समावेश आहे. यामधील बहुतांश डीलर हे रिलायन्स सिक्युरिटीजचे आहेत. या संस्थांना निर्बंधामुळे भांडवली बाजारात व्यवहार करण्यावर मनाई करण्यात आली होती.
महत्वाच्या बातम्या
- सरकारनं घोषणा केली दहा हजारांच्या मदतीची मात्र शेतकऱ्यांना मिळाले फक्त दोन हजार
- दीपिकाच्या बर्थडे पार्टीला रणबीर अलियाची हजेरी; पहा फोटो
- तब्बल 45 वर्षे बिनविरोध असलेल्या बार्शी तालुक्यातील आदर्श मळेगावात यंदा होणार निवडणुका
- ‘दानवेंनी फेकाफेकी करू नये, मी स्वतः संभाजीनगर संदर्भात फडणवीसांना चार पत्र पाठवली होती’
- तेलाच्या जाहिरातीतून सौरव गांगुलीला काढल्यानंतर अडानी ग्रुपच स्पष्टीकरण
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
