Share

महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा धुव्वा उडवत भाजपाच्या मनिषा धावडे झाल्या नागपूरच्या उपमहापौर

Published On: 

🕒 1 min read

नागपूर : नागपूरच्या महापौरपदी भाजपचे दयाशंकर तिवारी विजयी झाले असून, काल झालेल्या ऑनलाईन निवडणुकीत तिवारी यांना एकूण 151 नगरसेवकांपैकी 107 मतं मिळाली. त्यांचे प्रतिस्पर्धी काँग्रेसचे रमेश पुणेकर यांना 27 तर बसपाचे नरेंद्र वालदे यांना 10 मतं मिळाली. पाच सदस्य अनुपस्थित होते.

दरम्यान, उपमहापौर पदासाठी झालेल्या निवडणुकीत भाजपाच्या मनिषा धावडे 107 मत घेऊन विजयी झाल्या. महाविकास आघाडीच्या रश्मी धुर्वे यांना 26 तर बहुजन समाज पक्षाच्या वैशाली नारनवरे यांना 10 मत मिळाली. संख्याबळानुसार या निवडणुकीत भाजपचा अपेक्षित विजय झाला असून, भाजपच्या गोटात आनंद व्यक्त केला जात आहे.

नागपूर महापालिका निवडणूकीला सव्वावर्षाचा काळ उरलाय, या कार्यकाळात मनपाच्या खालावलेल्या आर्थिक स्थितीत चांगलं काम करण्याचं मोठं आव्हान दयाशंकर तिवारी यांच्यापुढे राहणार आहे.

दरम्यान, माजी महापौर संदीप जोशींनी यापुढे कोणतीही महापालिका निवडणूक न लढवण्याची घोषणा केली होती. त्यानंतर भाजपने नागपूर पदवीधर मतदारसंघाचे तत्कालीन आमदार अनिल सोले यांचं तिकीट कापून संदीप जोशी यांना उमेदवारी दिली. परंतु जोशींना भाजपचा बालेकिल्ला राखता आला नाही. संदीप जोशी यांचा पराभव करत काँग्रेस उमेदवार अभिजीत वंजारी मोठ्या फरकाने विजयी झाले.त्यानंतर जोशींनी आपल्या महापौर पदाचा राजीनामा दिला होता.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!