🕒 1 min read
मुंबई : – राज्याच्या महिला व बाल विकास विभागातील कंत्राटी व तत्सम पद भरतीत आता अनाथ मुलांना विशेष प्राधान्य दिले जाईल. यासंबधीचा धाडसी निर्णय महिला व बाल विकास राज्यमंत्री ओमप्रकाश ऊर्फ बच्चु कडू यांनी घेत अनाथ मुलानांही समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा राजमार्ग उपलब्ध करून दिला.
मुंबईच्या विधानभवनात राज्यमंत्री बच्चु कडू यांच्या अध्यक्षतेखाली महिला व बाल विकास विभागाची बैठक झाली. गेल्या कित्येक वर्षांपासून अनाथ मुलांना शिक्षण आणि शासकीय नोकरीसाठी झगडावे लागत होते.यासंबधी अनाथ मुलांना शिक्षण आणि नोकरीत विशेष प्राधान्य देण्याबाबतचा प्रस्ताव विचाराधीन होता. त्यानुसार महिला व बाल विकास विभागाच्या झालेल्या बैठकीत अनाथ मुलांना शिक्षण आणि नोकरीत 1 टक्का आरक्षण देण्याचा धाडसी निर्णय बच्चु कडू यांनी घेतला.
या निर्णयानुसार महिला व बाल विकास विभागात बाह्य यंत्रणेद्वारे भरल्या जाणाऱ्या कंत्राटी पदांसह जिल्हा बाल संरक्षण कक्षातील पदे,कौटुंबीक हिंसाचार संरक्षण कार्यालयातील सहाय्यक व बहुउद्देशीय पदे,डाटा एन्ट्री आँपरेटर व वन स्टाँप सेंटरच्या पदांमध्ये अनाथ मुलांना आता विशेष प्राधान्य दिले जाईल. मात्र ही पदे भरत असताना अनाथ मुलांना पदभरतीच्या आवश्यक असलेल्या नियमांचे पालन करावे लागणार आहे.
समाजाच्या सर्व घटकांना शिक्षण व नोकरीत आरक्षण दिले जात असताना अनाथ मुलांवर मात्र अन्याय होत होता.ते ही याच समाजाचे एक घटक आहेत.त्यामुळे शासनस्तरावर प्रलंबीत या विषयाला मुर्तरूप देत निर्णय घेतल्याचे महिला व बाल विकास विभागाचे राज्यमंत्री ओमप्रकाश ऊर्फ बच्चु कडू यांनी सांगितले.
महत्वाच्या बातम्या
- मराठा आरक्षणासारख्या संवेदनशील विषयावर भाजपा नेत्यांकडून होणारे राजकारण दुर्दैवी : सावंत
- शिवसेना म्हणजे नौटंकी सेना आहे; फडणवीसांची बोचरी टीका
- ‘विनायक मेटेंसारख्या दुटप्पी मंडळींपासून मराठा समाजाने सावध राहण्याची गरज’
- ‘तमाम गुजरातीद्वेष्ट्या शेणकिड्यांना, त्यांच्या मालकाकडून सप्रेम जलेबी-फाफडा !’
- संजय राऊत भाजपला सुरुंग लावण्याच्या तयारीत; राजकीय क्षेत्रात जोरदार चर्चा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
