🕒 1 min read
नाशिक : मराठवाड्याची राजधानी अशी ओळख असलेल्या औरंगाबाद शहराचं नामांतर करुन या शहराला संभाजीनगर हे नाव देण्याची शिवसेनेची आग्रही मागणी आहे. मात्र, गेल्या 5 वर्षे शिवसेना सत्तेत असतानाही आणि विशेष म्हणजे गेल्या वर्षभरापासून शिवसेना पक्षप्रमुख हेच राज्याचे मुख्यमंत्री असतानाही औरंगाबादचे संभाजीनगर झाले नाही.
औरंगाबादच्या नामांतरावरून भाजप नेते शिवसेनेवर जोरदार टीका करत आहे. अशातच आता राज्यातील महाविकास आघाडीतील घटकपक्ष असलेल्या समाजवादी पार्टीने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या पाठोपाठ समाजवादी पार्टीचे नेते अबू आझमी यांनी नामांतरणाला आपला विरोध दर्शवला आहे.
महाविकास आघाडी ही किमान सामान कार्यक्रमावर आधारित आहे. विकासकामांना प्राधान्य असून नामांतराला विरोध असल्याचं थोरात म्हणाले होते. काँग्रेसने किमान सामान कार्यक्रमाची आठवून करून देत एक प्रकारे सरकारमधील सहभागाची आठवण करून देत सत्ता टिकवण्यासाठी इशाराच दिला आहे.
नामांतराचा मुद्दा गेले अनेक दशके अडकला आहे. यावर भाजपचे राज्यसभा खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी औरंगाबाद हे नाव दुर्दैवी असून लवकरात लवकर नामकरण करावे अशी मागणी केली आहे. ते काल नाशिक दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद देखील साधला.
‘औरंगाबाद शहराचे नाव छत्रपती संभाजीनगर करणे अतिशय योग्य असून, ज्या मोगल बादशहाने छत्रपती संभाजी महाराजांना पकडून क्रूररित्या मारले, त्याचं नाव महाराष्ट्रातील एका मोठ्या शहराला असावे हे दुर्दैवी आहे. सर्व शिवभक्तांच्या भावेनाचा आणि अस्मितेचा विचार करुन सरकारने लवकर निर्णय घ्यावा, अशी मागणी संभाजीराजेंनी केली आहे.
https://www.facebook.com/YuvrajSambhajiraje/posts/1773476406143904
महत्वाच्या बातम्या
- काँग्रेसमध्ये मोठ्या बदलांची शक्यता; बाळासाहेब थोरात होणार पायउतार?
- भारत बायोटेकच्या कोवॅक्सिनच्या वापरावरून काँग्रेसचे नेते शशी थरुर यांनी नोंदविला आक्षेप
- चर्चेत असलेले क्युट कपल चहल-धनश्रीचे पहा फोटो
- विलासकाका उंडाळकरांच्या अंत्यदर्शनासाठी रितेश देशमुख कराडमध्ये
- स्मार्ट योजनेच्या नोंदणी प्रक्रियेमध्ये लातूर जिल्हा राज्यात अव्वल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
