Share

विलासकाका उंडाळकरांच्या अंत्यदर्शनासाठी रितेश देशमुख कराडमध्ये

Published On: 

🕒 1 min read

कराड : काँग्रेसच्या विचारधारेशी शेवटपर्यंत एकनिष्ठ असलेले माजी सहकारमंत्री विलासकाका पाटील उंडाळकर याचं आज पहाटे अल्पशा आजाराने निधन झाले. ते 85 वर्षांचे होते. सातारा येथील हॉस्पिटलमध्ये त्यांनी आज अखेरचा श्वास घेतला.

विलासराव उंडाळकर नेहमी पुरोगामी विचारांसाठी ओळखले जायचे. त्यांनी सलग 35 वर्ष कराड दक्षिण मतदार संघाचे प्रतिनिधित्व केलं. 2004 च्या महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळात त्यांचा समावेश होता.सहकार मंत्री म्हणून त्यांनी दमदार काम केलं होतं.

विलासकाका उंडाळकर आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे एकमेकांचे कट्टर विरोधक होते हे सगळ्यांच माहित होतं. पंरतु दोन महिन्यांपूर्वी दोघांमध्ये दिलजमाई झाल्याचं देखील समोर आलं होतं. राजकीय जीवनात त्यांनी अनेक सहाकरी संस्था उभारल्या. त्यांच्या जाण्याने कराड, साताऱ्यासह संपूर्ण महाराष्ट्रातून हळहळ व्यक्त होत आहे.

सातारा जिल्ह्यात कराड तालुक्यातील उंडाळे या मूळगावी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत. काँग्रेसचे दिवंगत नेते विलासराव देशमुख यांचा सुपुत्र आणि प्रख्यात अभिनेता रितेश देशमुखही अंत्यदर्शनासाठी उपस्थित होता. विलासकाका उंडाळकर यांनी विलासरावांच्या कार्यकाळात मंत्रिपद भूषवल्यामुळे देशमुख-उंडाळकर कुटुंबाचे घनिष्ठ संबंध होते. रितेश देशमुख यांच्यासह भाजप नेते आणि मेहुणे अतुल भोसलेही अंत्यदर्शनाला उपस्थित राहिले होते.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!