नवी दिल्ली : देशातील सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांनी कोरोना व्हायरससंदर्भात लसीकरणासाठी तयार राहावं, अशी सूचना केंद्र सरकारने केली आहे. यातच नुकतीच ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया अर्थात डीसीजीआयने दोन कोरोना प्रतिबंधात्मक लसींना आपत्कालीन वापरासाठी परवानगी दिली आहे.
काल घेतलेल्या पत्रकार परिषदेत डीसीजीआयने ही माहिती दिली आहे. डीसीजीआयचे संचालक व्हीजी सोमाणी यांनी सीरमच्या कोविशिल्ड आणि भारत बायोटेकच्या कोवॅक्सिन लसीला आपातकालीन वापरासाठी परवानगी दिली आहे.
दरम्यान, एका बाजूला संजीवनी म्हणून पहिले जात असलेल्या या लसीच्या बाबतीत जय्यत तयारी सुरु असताना आता या लसीच्या बाबतीत देखील राजकारण होऊ लागले आहे. भारत बायोटेकच्या कोवॅक्सिनच्या वापरावरून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरुर यांनी आक्षेप नोंदविला आहे.
शशी थरूर ट्विट करून म्हणाले की, ‘कोवॅक्सिनची तिसऱ्या टप्प्यातील चाचणी अद्याप पूर्ण झाली नाही. वेळेच्या आगोदर या लसीला मान्यता देण्यात आली आहे. जे धोकादायक ठरू शकतं.’ तसेच त्यांनी ट्विटद्वारे केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी चाचणी पूर्ण होईपर्यंत प्रतीक्षा करण्याचा आग्रह केला आहे
ते ट्विटमध्ये म्हणाले की, ‘केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी जोपर्यंत लसीची चाचणी पूर्ण होत नाही तोपर्यंत थांबायला हवं. हिंदुस्थानात या दरम्यान अ;ॅस्ट्रॅजेनेका लसद्वारे लसीकरण सुरू केले जाऊ शकते’ असा पर्याय देखील त्यांनी सुचविला आहे.
दरम्यान, याआधी मी लसीकरण करवून घेणार नाही. भाजप सरकार कडून देण्यात येत असलेल्या लसीवर मी कसा विश्वास ठेवू ? असा सवाल समाजवादी पार्टीचे नेते अखिलेश यादव यांनी केला आहे. आमचं सरकार आल्यावर आम्ही सर्वांना मोफत लस देवू असे आश्वासन देखील यादव यांनी दिले आहे.
महत्वाच्या बातम्या
- पीसीएमसी ते फुगेवाडी या सहा किलोमीटर मार्गावर मेट्रोची चाचणी पूर्ण
- फुले वाड्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी महाविकास आघाडीचे सरकार कटिबद्ध – धनंजय मुंडे
- काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी कोरोना लसीला मान्यता देण्याच्या प्रक्रियेवर केले ‘हे’ प्रश्न उपस्थित
- एखाद्या मोठ्या जिल्ह्याचे विभाजन करून त्या जिल्ह्याला संभाजीनगर नाव द्या : सचिन खरात
- स्मार्ट योजनेच्या नोंदणी प्रक्रियेमध्ये लातूर जिल्हा राज्यात अव्वल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
