Share

काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी कोरोना लसीला मान्यता देण्याच्या प्रक्रियेवर केले ‘हे’ प्रश्न उपस्थित

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली : देशातील सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांनी कोरोना व्हायरससंदर्भात लसीकरणासाठी तयार राहावं, अशी सूचना केंद्र सरकारने केली आहे. यातच नुकतीच ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया अर्थात डीसीजीआयने दोन कोरोना प्रतिबंधात्मक लसींना आपत्कालीन वापरासाठी परवानगी दिली आहे.

काल घेतलेल्या पत्रकार परिषदेत डीसीजीआयने ही माहिती दिली आहे. डीसीजीआयचे संचालक व्हीजी सोमाणी यांनी सीरमच्या कोविशिल्ड आणि भारत बायोटेकच्या कोवॅक्सिन लसीला आपातकालीन वापरासाठी परवानगी दिली आहे.

दरम्यान, एका बाजूला संजीवनी म्हणून पहिले जात असलेल्या या लसीच्या बाबतीत जय्यत तयारी सुरु असताना आता या लसीच्या बाबतीत देखील राजकारण होऊ लागले आहे.काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी लसीला मान्यता देण्याचा प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित केले आहेत.

“भारत बायोटेक ही एक उत्तम गुणवत्ता असणारी आणि विश्वासार्ह कंपनी आहे. मात्र या कंपनीने तयार केलेल्या लसीच्या फेज-3 च्या ट्रायलसाठी प्रक्रिया मूळ नियमांत पदल करण्यात येत आहेत. हे चकित करणारं आहे,” असं माजी मंत्री जयराम रमेश यांनी म्हटलं आहे. तसेच, त्यांनी असं करण्यामागचं नेमकं कारण सांगण्याचं आवाहनही केंद्रीय आरोग्य मंत्र्यांना केलं आहे.

दरम्यान, याआधी मी लसीकरण करवून घेणार नाही. भाजप सरकार कडून देण्यात येत असलेल्या लसीवर मी कसा विश्वास ठेवू ? असा सवाल समाजवादी पार्टीचे नेते अखिलेश यादव यांनी केला आहे. आमचं सरकार आल्यावर आम्ही सर्वांना मोफत लस देवू असे आश्वासन देखील यादव यांनी दिले आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!