Share

“जनतेचा विश्वास संपादन करण्यासाठी, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आधी ही कोरोनावरील लस घ्यावी”

Published On: 

🕒 1 min read

पटना : देशात कोरोनाच्या दोन लसींना मंजुरी मिळाल्यानंतर आता यावरून राजकारण सुरू झाले आहे. एकीकडे उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी ही लस घेण्यास नकार दिला. त्यांनी म्हटले आहे की, ही भाजपची लस आहे. दुसरीकडे, काँग्रेसचे आमदार दिग्विजय सिंह यांचे बंधू लक्ष्मण सिंह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आधी ही कोरोनावरील लस घ्यावी असा सल्ला दिला आहे.

रशिया आणि अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी ज्या प्रकारे लसविषयी जनतेचा विश्वास संपादन करण्यासाठी आधी स्वतः लसचा डोस घेतला होता. त्याचप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही कोरोनाची पहिली लस घ्यावी. जेणेकरून या लसीबद्दल जनतेचा आत्मविश्वास वाढेल, असे काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते अजित शर्मा यांनीही मोदींना सल्ला दिला आहे.

कोरोना लसीवर उद्भवलेल्या प्रश्नांच्या पार्श्वभूमीवर मध्य प्रदेशातील चाचौडा येथील काँग्रेसचे आमदार आणि दिग्विजय सिंह यांचे बंधू लक्ष्मण सिंह यांनी पंतप्रधान आणि सर्व मुख्यमंत्र्यांना आधी लस घेण्याचा सल्ला दिला आहे. याबद्दल त्यांनी ट्विट केले आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, “कोविड लसीबाबत अनेक गैरसमज आहेत. पंतप्रधान आणि सर्व मुख्यमंत्री, मंत्री, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आधी लस घ्यावी. सर्व काही ठीक झाले तर जनता सुद्धा लस घेईल.”

दरम्यान, शनिवारीच कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन या लसींना सेंट्रल ड्रग्स स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन (CDSCO)च्या कोरोनावरच्या तज्ज्ञ समितीने मान्यता दिली होती. त्यानंतर आता डीसीजीआयकडून परवानगी मिळाली आहे. सोबतच कॅडीलाच्या लसीला तिसऱ्या टप्प्यातल्या क्लिनिकल ट्रायल करायलाही परवानगी देण्यात आली आहे.

यांनतर मात्र राजकीय टीका टिपण्णीला सुरुवात झाली असून यावर कॉंग्रेस नेते शशी थरूर आणि जयराम रमेश यांनी सवाल उपस्थित केला असून थरूर यांनी म्हटलं अद्याप कोवॅक्सिन लसीच तिसर्या टप्प्यातील परीक्षण बाकी आहे मग य लसीला परवानगी देण्याची घाई का केली जात आहे असा प्रश्न थरूर यांनी आरोग्य मंत्र्यांना केला आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!