Share

भाजपमधून राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर ED च्या नोटिसाही सोबत येतात- रुपाली चाकणकर

Published On: 

🕒 1 min read

पुणे:- भाजपमधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेलेले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना अंमलबजावणी संचालनालयाने काही दिवसांपूर्वी नोटीस बजावली आहे. या नोटीसनुसार एकनाथ खडसे यांना ३० डिसेंबर रोजी चौकशीसाठी ईडी समोर हजर राहावे लागणार होते. परंतु ईडीकडे हजेरी लावण्याअगोदरच एकनाथ खडसे यांचा कोरोनाचा अहवाल दुसऱ्यांदा पॉझिटिव आल्याचे समजत आहे.

दरम्यान, सध्या ईडी नोटीशीवरून महाराष्ट्रातील राजकीय वातावरण चांगलंच गरम झाले आहे. महाविकास आघाडी सरकारमधील नेते भाजपवर या मुद्द्यावरून जोरदार टीका करत आहे. भाजपच्या नेत्यांना ईडीच्या नोटिसा येत नाहीत, ईडीच्या नोटिसा या फक्त राजकीय हेतूनेच प्रेरित होऊन येतात, भाजपमधून राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केल्यानंतर त्या प्रवेशासोबत ईडीच्या नोटिसा बरोबर येतात, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी भाजपवर केली आहे. त्या पुण्यात पत्रकारांशी बोलत होत्या.

दरम्यान, मागील वर्षभरात अनेक दिग्गजांना ईडीने नोटिसा पाठवलेल्या आहेत. वर्षअखेरीस सरनाईक कुटुंब, एकनाथ खडसे, वर्षा संजय राऊत, रत्नाकर गुट्टे यांना ईडीने समन्स बजावलं होतं. भाजपशी वाकड्यात शिरल्याने ईडीसारख्या केंद्रीय संस्थांचा ससेमिरा मागे लावल्याचा आरोप प्रत्येक वेळी झाला आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!