🕒 1 min read
मुंबई : शिवसेनेचे दिग्गज नेते संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) नोटीस पाठवली आहे. वर्षा राऊत यांनी पंजाब-महाराष्ट्र सहकारी बँक खात्यातून संजय राऊतांच्या सहकाऱ्यासोबत केलेल्या व्यवहाराप्रकरणी ईडीने नोटीस पाठवली आहे. यानंतर राजकीय क्षेत्रात मोठी खळबळ माजली आहे.
याआधी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक, भाजपमधून नुकतंच राष्ट्रवादीत प्रवेश केलेले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे आदी नेत्यांना ईडीने नोटीस बजावल्याचं गेल्या काही वर्षात दिसून येतंय. आता हा ईडीचा वाद आणखी चिघळल्याचं दिसून येत आहे.
ईडी विरोधात शिवसेना रस्त्यावर उतरण्याची शक्यता आहे. येत्या 5 जानेवारीला महाराष्ट्रातून शिवसैनिक मुंबईत दाखल होणार असल्याचं बोललं जात आहे. मुंबईसह ठाणे, नवी मुंबई, मिरा भाईंदरमधून बसेस, कारने शिवसैनिक दाखल होणार आहेत. दरम्यान, याच दिवशी वर्ष राऊत ह्या ईडीसमोर चौकशीसाठी हजर राहणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
त्यावेळी अनेक शिवसैनिक त्यांच्यासोबत हजर असतील. एकप्रकारचं शक्तीप्रदर्शन शिवसेनेकडून केलं जाणार आहे. केंद्र सरकार तपास यंत्रणांचा कशाप्रकारे गैरवापर करतंय हे दाखवण्याचा शिवसेनेचा प्रयत्न असणार आहे. विवधि पक्षातील नेत्यांना आदींची नोटीस येत असताना भाजपमधील एकही नेत्याला ईडीने कधीही समन्स बजावलेले नाही, त्यामुळे ही कारवाई राजकीय सूडबुद्धीने केली जात असल्याचा आरोप महाविकास आघाडीतील नेत्यांनी केला आहे.
महत्वाच्या बातम्या
- सकाळी मोफत कोरोना लसीची घोषणा आता केंद्रीय आरोग्य मंत्र्यांची पलटी
- ‘धोनीचं टी 20 मध्ये काहीच योगदान नाही ‘या ‘खेळाडूची जहरी टीका
- नामांतर हा कॉमन मिनिमम प्रोगामचा भाग नाही, आमचा नामांतराला विरोधच – अशोक चव्हाण
- आजचे स्टार्टअप्सचं उद्याच्या मोठ्या मल्टीनॅशनल कंपनी बनतील – नरेंद्र मोदी
- लक्षात येतेय का थयथयाटाचे कारण? भाजप नेत्याचा राऊतांवर हल्लाबोल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
