Share

‘धोनीचं टी 20 मध्ये काहीच योगदान नाही; ‘या’ खेळाडूची जहरी टीका 

Published On: 

मुंबई : टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीधोनीने आपल्या नेतृत्वात टीम इंडियाला आयसीसीच्या तिन्ही स्पर्धांचे विजेतेपद मिळवून दिलं. धोनीने आपल्या नेतृत्वामध्ये टीम इंडियाला शिखरावर नेऊन ठेवलं. आयसीसीने नुकतेच दशकातील सर्वोत्तम संघाची आणि खेळाडूंची घोषणा केली.

यामध्ये धोनीला सर्वोत्तम एकदिवसीय आणि टी 20 संघाच्या नेतृत्वपदी निवड केली. त्यामुळे धोनीवर पुन्हा एकदा चाहत्यांनी कौतुक केलं. मात्र धोनीला टी 20 टीमचा कर्णधार केल्याने एका माजी क्रिकेटपटूने आक्षेप घेतला आहे. भारताचा माजी सलामीवीर आणि समालोचक आकाश चोप्राने धोनीवर घणाघात केला आहे.

“धोनीचं टी 20 क्रिकेटमध्ये विशेष योगदान नाही. धोनीने टी 20 मध्ये फारशी चमकदार कामगिरी केलेली नाही. यानंतरही धोनीला दशकातील सर्वोत्तम संघात स्थान दिलं. म्हणून मी हैराण आहे”, असं आकाश चोप्रा म्हणाला. तसेच दशकातील सर्वोत्तम टी 20 संघात इंग्लंडचा जोस बटलर नसल्याने आकाश चोप्राने नाराजी व्यक्त केली.

धोनीसह टीम इंडियावरही आकाशने हल्लाबोल केला आहे. “भारताने टी 20 मध्ये फार विशेष कामगिरी केलेली नाही”, असंही चोप्राने नमूद केलं. “टी 20 संघात धोनीऐवजी जोस बटलर हवा होता”, असं चोप्रा म्हणाला.

याआधी आयपीएलच्या १३ व्या पर्वात चेन्नई सुपरकिंग्स आणि कर्णधार महेंद्रसिंग धोनी यांची कामगिरी अतिशय निराशाजनक झाली होती. आयपीएलच्या इतिहासात फायनल्सच्या शर्यतीत राहणारा हा संघ यावेळी मात्र साखळी फेरीतच गारद झाला. गुणतालिकेत हा संघ थेट सातव्या स्थानी फेकला गेला.

त्यामुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधून सन्यास घेतलेला धोनी पुढे खेळणार की नाही, अशी चाहत्यांमध्ये कुजबूज सुरू झाली. तथपि नंतर धोनीनेच आपण चेन्नईकडून खेळत राहणार असल्याचे स्पष्ट केले होते. यावर माजी खेळाडू आणि समालोचक असलेला आकाश चोप्रा याने पुढच्या वर्षी आयपीएलसाठी लिलाव झाल्यास सीएसकेने धोनीला सोडून द्यायला हवे, असे मत व्यक्त केले होते .

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!