Share

म्हणून IPL मधून एग्जिट घेतली रैनाचा खुलासा

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : आयपीएल २०२०चे बिगुल वाजण्यापूर्वी माजी भारतीय क्रिकेटपटू सुरेश रैनाने अचानक आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. स्वातंत्र्यदिनी रैनाने केलेल्या या अनपेक्षित घोषणेमुळे क्रिकेटविश्व हादरुन गेले होते. परंतु आयपीएल २०२०मध्ये तरी रैनाची खेळी पाहायला मिळेल, अशी चाहत्यांना अपेक्षा होती.

मात्र, वैयक्तिक कारणामुळे रैनाने आयपीएलमधून माघार घेतल्याने तेही अशक्य झाले. त्यामुळे चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली.  एन. श्रीनिवासन यांनीही रैनाबाबत तीव्र नाराजी व्यक्त करत स्फोटक विधान केलं होतं, तरीही त्या वेळी रैनानं कोणतंही स्पष्टीकरण दिलं नव्हतं.

नुकतचं त्यानं टाईम्स ऑफ इंडियाशी बोलताना या निर्णयामागचं कारण स्पष्ट केलं. त्या काळात त्याच्या कुटुंबात एक भयंकर दुर्दैवी घटना घडली होती, त्यामुळे त्याच्या कुटुंबाला त्याची गरज होती. पठाणकोटमध्ये एका दरोड्यात त्याच्या काका, काकूची निधन झाले होते.

तसंच कोरोना साथीच्या काळात आपल्या पत्नीलाही आपली गरज होती, त्यामुळं आपण परत येण्याचा निर्णय घेतल्याचं रैनानं सांगितलं. या निर्णयाचा आपल्याला कोणताही पश्चाताप नाही. हा वेळ मी कुटुंबासोबत घालवला. गेली 20 वर्षे मी खेळत आहे. मी पुन्हा खेळेनच पण जेव्हा तुमच्या कुटुंबाला तुमची गरज असते तेव्हा तुम्ही त्यांच्याबरोबर असणं आवश्यक असतं. माझा हा निर्णय योग्य होता असं वाटतं, असंही रैनानं सांगितलं.

दरम्यान,  रैना सय्यद मुश्ताक अली  टी२० स्पर्धेचा भाग असणार आहे. तो सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमधील उत्तर प्रदेश संघाचे प्रतिनिधित्त्व करणार आहे. स्वत: रैनाने सर्वांना या गोष्टीची माहिती दिली होती. याव्यतिरीक्त आगामी आयपीएलमध्येही आपण सहभागी होत असल्याचं रैनाने स्पष्ट केलं. त्यामुळे चाहते रैनाला लवकरच खेळताना पाहू शकतात.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!