🕒 1 min read
जालना: देशातील सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांनी कोरोना व्हायरससंदर्भात लसीकरणासाठी तयार राहावं, अशी सूचना केंद्र सरकारने केली आहे.2 जानेवारीला देशातील सगळी राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये लसीकरणाची रंगीत तालीम म्हणजेच ‘ड्राय रन’ घेतली जाईल, असं केंद्र सरकारने म्हटलं आहे.
या ड्राय रन लसीकरण साठी राज्यातील पुणे नागपूर जालना आणि नंदुरबार या चार जिल्ह्यांची निवड करण्यात आली आहे. या चार जिल्ह्यांत प्रत्येकी तीन आरोग्य केंद्रावर हे लसीकरण सुरू करण्यात येणार आहे.
ड्राय रन म्हणजे लसीकरणाचे रंगीत तालीम असून यामध्ये प्रत्यक्षात कोणालाही लस टोचली जात नाही. लसीकरण याची तयारी पूर्ण झाली आहे किंवा नाही यासाठी तालीम घेण्यात येणार आहे त्या पार्श्वभूमीवर राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी जालना येथे या तालिमी बद्दल माहिती दिली आहे.
यावेळी त्यांनी राज्यातील जनतेला नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या. सिरम लसीला आपत्कालीन वापरांसाठी मंजुरी मिळाल्यानंतर आता ड्रग कंट्रोल ऑथॉरिटी ने याला मान्यता दिल्यानंतर प्रत्यक्षात लसीकरण सुरू करण्यात येणार आहे. तर 25 लोकांना लसीकरणाची ड्राय रन घेण्यात येणार आहे.
तर या रंगीत तालीम नंतर लोकांमध्ये लसीकरण याची भीती त्यासाठी ही तालीम घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. तर यावेळी लस घेण्यासाठी आलेल्या नागरिकांना त्यांचे ओळखपत्र दाखवावे लागणार आहे. तर व्यक्ती च्या ओळखपत्राची खात्री पटल्यानंतर हे लसी करण पार पडेल. तर यावेळी कोरोना अद्याप संपल्यात नसल्याने या पार्श्वभूमीवर खबरदारी घेणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.
महत्वाच्या बातम्या
- बांधकाम विभागातील बिल घोटाळ्याची चौकशी न केल्यास न्यायालयात जाऊ-अतुल भातखळकर
- सोनू सूद उतरणार राजकारणाच्या मैदानात?
- अजितदादा, आमच्याकडे चहाला या; फडणवीसांनी दिलं खास आमंत्रण
- सभागृहात पवार-फडणवीस एकाच मंचावर, तर बाहेर दोन्ही पक्षांच्या समर्थकांची हुल्लडबाजी
- कारवाई तर होणारच; न्यायालयाने फेटाळली कंगनाची याचिका
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
