🕒 1 min read
नवी दिल्ली : देशातील कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असली तरीही धोका मात्र कायम आहे. दिवाळीनंतर कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ झाली होती. मात्र, आता कोरोनाचा प्रादुर्भाव काहीसा कमी झाला आहे. अस असली तरीही पुन्हा संसर्ग वाढण्याचा धोका आहेच. ब्रिटनमध्ये कोरोनाचा नवा आणि आधीच्या तुलनेत अधिक धोकादायक स्ट्रेन आढळून होता.
यामुळे ब्रिटनहून भारतात येणारी आणि भारतातून बाहेर जाणारी हवाई वाहतूक रोखण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला होता. २३ डिसेंबर पासून ही हवाई वाहतूक बंद करण्यात आली होती. यानंतर, सुरुवातीला 31 डिसेंबरपर्यंत असलेली ही विमान उड्डाणांवरची बंदी आणखी वाढवण्याचाही निर्णयही झाला. ७ जानेवारीपर्यंत ही हवाईसेवा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
आता ही बंदी उठवण्याची तारीख निश्चित करण्यात आली आहे. 8 तारखेपासून भारत आणि यूकेदरम्यानची विमानसेवा सुरू होईल. 23 जानेवारीपर्यंत फक्त आठवड्याला 15 उड्डाणांना परवानगी देण्यात आली आहे. दिल्ली, मुंबई, बंगळुरू आणि हैदराबाद इथून यूकेला जाणारी फक्त 15 विमानं दर आठवड्याला उडू शकतील, असं नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने स्पष्ट केलं आहे.
It has been decided that flights between India & UK will resume from 8th January, 2021. Operations till 23 Jan will be restricted to 15 flights per week each for carriers of two countries to & from Delhi, Mumbai, Bengaluru & Hyderabad only: Union Civil Aviation Minister pic.twitter.com/IsBiCFhvg9
— ANI (@ANI) January 1, 2021
महत्वाच्या बातम्या
- मी काय पुण्यातच असतो; अजित पवारांचा फडणवीसांना टोला
- ‘अजितदादा, आपण जनतेसाठी जे काम करायचं ते करायचंच’
- अजितदादा, आमच्याकडे चहाला या; फडणवीसांनी दिलं खास आमंत्रण
- सभागृहात पवार-फडणवीस एकाच मंचावर, तर बाहेर दोन्ही पक्षांच्या समर्थकांची हुल्लडबाजी
- ‘भाजपच्या दिल्लीतील नेत्यांनी आता चाळ कमिटीच्या निवडणुकीतही उतरावं’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
