Share

सभागृहात पवार-फडणवीस एकाच मंचावर, तर बाहेर दोन्ही पक्षांच्या समर्थकांची हुल्लडबाजी

Published On: 

🕒 1 min read

पुणे : पुणे शहराच्या पूर्व भागातील सुमारे १५ लाख लोकांना सुरळीत पाणीपुरवठा होण्यासाठी पुणे महापालिकेच्या ‘भामा-आसखेड पाणीपुरवठा प्रकल्पा’चा १ जानेवारी २०२१ रोजी ऑनलाईन लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आला होता. हा कार्यक्रम नुकताच पार पडला आहे.

महापालिकेच्या नवीन इमारतीतील श्री छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात दुपारी चार वाजता या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यास राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस , भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, खासदार गिरीश बापट आदी नेते व इतर नगरसेवक उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री अजित पवार आणि विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस एकाच मंचावर येणार असल्याने या कार्यक्रमाकडे राज्याचे लक्ष लागले होते. मात्र, या कार्यक्रमांनंतर पुणे शहराच्या संस्कृतीला न शोभणारं वर्तन राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांचं दिसून आलं. एकीकडे हे सर्व नेते सभागृहात एका एकाच मंचावर आलेले दिसले.

तर दुसरीकडं, या सभागृहाबाहेर दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते हे आमने-सामने आल्याचं दिसून आलं. यावेळी दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी महापालिकेतच मोठा जमाव करून घोषणाबाजी सुरु केली. प्रमुख नेते पुढील कार्यक्रमासाठी बाहेर पडले. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी अजित पवार यांच्या नावाने तर भाजपच्या कार्यकर्त्यांनी गिरीश बापट यांच्या नावाच्या घोषणा दिल्या. वर्षाच्या पहिल्याच दिवशी या कार्यकर्त्यांनी धक्काबुक्की देखील केली. त्यामुळे महापालिकेतच असं वर्तन हे चुकीचं असून कोरोनाच्या सर्वच नियमांना हरताळ फासल्याचं देखील दिसून आलं.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!