Share

मुख्यमंत्री महोदय, सरकार इतके निर्दयी कसे काय झाले ? नववर्षानिमित्त पोस्टरमधून मनसेचा सवाल

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : २०२० हे वर्ष संपलं असून आता २०२१ या वर्षासह नव्या दशकाला देखील सुरुवात झाली आहे. गेल्या वर्षभरात कोरोना महामारीमुळे सर्वच नागरिकांना मोठ्या संकटांचा सामना करावा लागला होता. याच काळात, उद्योग-व्यवसायावर देखील विपरीत परिणाम झाला. यामुळे अनेकांना आपला रोजगार देखील गमवावा लागला होता.

राज्यात लॉकडाऊन दरम्यान जनतेला आलेल्या वाढीव वीजबिलाच्या मुद्द्यावरुन राजकारण तापलं होतं. मनसेने वीजबिल माफीवरुन आक्रमक भूमिका राज्यभर आंदोलन केलं. तर भाजपकडून माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रविण दरेकर देखील राज्य सरकारवर टीकेची झोड उठवली होती.

अद्यापही राज्य सरकारने या वीजबिलांबाबत ग्राहकांना दिलासा दिलेला नाही. मनसेने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना नववर्षाच्या शुभेच्छा देतानाच विबिल माफीची आठवण करून दिली आहे. ‘मा. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. मुख्यमंत्री महोदय गोड बोलता बोलता नवीन वर्ष आलं. गोड बातमी तर राहिली दूर पण जनतेचे हालचं हाल झाले. जनतेच्या खिशात पैसा नाही तरी वीज बिल भरा, ऊर्जा मंत्री म्हणाले. मुख्यमंत्री साहेब सरकार इतकं निर्दयी कसं झालं…?’ असा सवाल करत मनसेने पोश्टरबाजी केली आहे. या आशयाचा बॅनर मनसेने मातोश्री बाहेरच लावला असून मुख्यमंत्री साहेबांची नजर पडून याची दाखल ते घेतील असा टोमणा देखील मनसेकडून लागवण्यात आला आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!