Share

शिवसेनेचा मुख्यमंत्री असुनही औरंगाबाद शहराचे नाव संभाजीनगर का होत नाही : मनसे

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद- मराठवाड्याची राजधानी अशी ओळख असलेल्या औरंगाबाद शहराचं नामांतर करुन या शहराला संभाजीनगर हे नाव देण्याची शिवसेनेची आग्रही मागणी आहे. मात्र, गेल्या 5 वर्षे शिवसेना सत्तेत असतानाही आणि विशेष म्हणजे गेल्या वर्षभरापासून शिवसेना पक्षप्रमुख हेच राज्याचे मुख्यमंत्री असतानाही औरंगाबादचे संभाजीनगर झाले नाही

आता याच मुद्यावरून राजकारण रंगताना पाहायला मिळत आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांना प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर, बोलताना आमचा त्यास विरोध असल्याचं थोरात यांनी ठामपणे सांगितलं आहे.

आम्हाला सत्ता सुद्धा दुय्यम ठरते, राज्यघटनेची शपथ घेऊन आम्ही सत्तेत आलोय. त्यामुळे, त्या शपथेची प्रताडना होईल, अशी कुठलीही गोष्ट आम्हाला मान्य होणार नाही. महाविकास आघाडीही त्याचा आधारावर निर्माण झालेली आहे. सामाजिक मतभेदाला आमच्याकडे स्थान नाही, असे म्हणत संभाजीनगर या नामांतरणाला आमचा विरोध राहिल, असे बाळासाहेब थोरातांनी ठामपणे सांगितंलय.

दरम्यान, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या विधानावर औरंगाबाद मनसे जिल्हा प्रमुख सुहास दशरथे यांनी निषेध व्यक्त केला आहे. याच बरोबर ‘शिवसेना सत्तेची लाचारी पत्करतो, की हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या शब्दाला किंमत देतो’ हे येत्या काळात कळेलच असेही ते म्हणाले. शिवसेनेचा मुख्यमंत्री असुन, औरंगाबाद शहराचे नाव संभाजीनगर का होत नाही. असा सवालही त्यांनी यावेळी विचारला आहे.२६ जानेवारी पर्यंत नामांतर झाले नाही तर मनसे मोठे आंदोलन उभारेल असा इशारा देखील त्यांनी दिला आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!