नागपूर: “मी कधी हेलिकॉप्टर मधून प्रवास केला? हे सुप्रिया ताईंनी दाखवून द्यावं,” असं आव्हान सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सुप्रिया सुळे यांना दिलं आहे.
आज चंद्रकांत पाटील यांनी राज्यातील १७ जिल्हे १०० टक्के खड्डेमुक्त झाल्याचा दावा केला आहे. त्यावर सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री आणि चंद्रकांतदादा यांनी हेलिकॉप्टर मधून उतरून जनतेत याव म्हणजे तुम्हाला खड्डे दिसतील असा टोला लागवाला आहे. यावर आता चंद्रकांत पटीन यांनी सुप्रिया सुळे यांना आव्हान दिल आहे
दरम्यान, जर काही ठिकाणी खड्डे असतील, तर सामान्य लोकांनी सांगावं. जिथे खड्डा आहे असेल, तिथे मी स्वत: खुर्ची टाकून बसेन, आणि खड्डा भरून देईन, असं देखील चंद्रकांत पाटलांनी स्पष्ट केलं.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
