Share

पुण्यामध्ये गव्या नंतर हरणांच्या कळपांचे आगमन

Published On: 

🕒 1 min read

पुणे : काही दिवसांपुर्वी कोथरुड आणि बावधन भागात रानगवा आढळून आला होता. आता शिवणे येथील आशिर्वाद सोसायटीत हरणाचा कळप मंगळवारी दुपारी दिसून आला आहे. हा कळप दिसल्यानंतर स्थानिकांनी वनविभागाशी संपर्क साधल्यानंतर वनविभागाचे अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली.

यावेळी एनडीएच्या तुटलेल्या संरक्षण भिंतीची तातडीने दुरुस्ती करावी, असे पत्र वनविभाग आता एनडीए व्यवस्थापनाला देणार आहेत. दरम्यान नागरिक हरणांना गवत खायला घालत होते. आता या हरणांचा फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहेत.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी  एक महिन्यापुर्वी कोथरुड येथे रानगवा वाट चुकून आला होता. त्यावेळी नागरिकांनी प्रचंड गर्दी केल्यामुळे गवा घाबरून पळत सुटला. त्याला पकडण्याच्या नादात रानगवा जखमी अवस्थेत पकडल्यानंतर काही तासात तो मृत्यूमुखी पडला. त्यानंतर पुन्हा पाषाण तलावासमोर आणखी एक रानगवा दिसून आला. त्यावेळी तात्काळ वनविभाग व पोलीस दाखल झाले. प्रशासनाने नागरिकांना गर्दी न करण्याचे आवाहन केले होते. त्याला नागरिकांनी प्रतिसाद दिला. त्यामुळे रानगव्याला परत पाठवण्यास वन विभागाला यश आले होते.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!