🕒 1 min read
मुंबई : नुकत्याच बीसीसीआयने भारतीय देशांतर्गत क्रिकेटमधील सर्वात रोमांचक सय्यद मुश्ताक अली टी२० स्पर्धेच्या तारखा घोषित केल्या आहेत. १० जानेवारी ते ३१ जानेवारी २०२१ दरम्यान ही स्पर्धा रंगणार आहे. ६ वेगवेगळ्या राज्यांमध्ये ही स्पर्धा खेळली जाईल. लवकरच या स्पर्धेच्या पूर्ण वेळापत्रकाची घोषणा करण्यात येईल, बीसीसीआयने अशी माहिती दिली आहे.
भारताचा माजी ऑल राऊंडर युवराज सिंग याला बीसीसीआय (BCCI) ने धक्का दिला आहे. मागच्या वर्षी क्रिकेटमधून निवृत्ती घेणाऱ्या युवराजला सैयद मुश्ताक अली ट्रॉफी मध्ये खेळायचं होतं, पण बीसीसीआयने युवराजची निवृत्ती मागे घ्यायला परवानगी दिली नाही. टाईम्स ऑफ इंडियामध्ये आलेल्या वृत्तानुसार युवराज सिंगला बीसीसीआयने संन्यास मागे घ्यायला मंजुरी दिली नाही. युवराजने पंजाबचं प्रतिनिधीत्व करण्यासाठी बीसीसीआयला विनंती केली होती. आता मनदीप सिंगच्या नेतृत्वात पंजाबची टीम मैदानात उतरणार आहे.
पंजाब क्रिकेट असोसिएशनचे सचिव पुनित बाली यांनी युवराजला निवृत्ती मागे घेऊन पुन्हा खेळण्याचं आवाहन केलं होतं, यानंतर युवराजची पंजाबच्या संभाव्य 30 खेळाडूंच्या यादीत निवड झाली होती. पण निवड समितीने युवराजला 20 सदस्यीय टीममध्ये संधी दिली नाही. बीसीसीआयच्या नियमांनुसार परदेशामध्ये लीग खेळणाऱ्या खेळाडूंना भारताकडून स्थानिक किंवा आंतरराष्ट्रीय मॅच खेळता येत नाहीत, त्यामुळे युवराजला निवृत्तीतून पुनरागमन करायला बीसीसीआयने परवानगी दिली नसल्याचं सांगितलं जात आहे. युवराज सिंग हा कॅनडामध्ये झालेल्या लीगमध्ये खेळला होता.
पंजाबची टीम :
मनदीप सिंग (कर्णधार), गुरकीरत मान (उपकर्णधार), रोहन मारवाह, मयंक मारकंडे, बरिंदर सरन, अभिषेक शर्मा, रमनदीप सिंग, सिद्धार्थ कौल, अर्शदीप सिंग, हरप्रीत ब्रार, बलतेज ढांढा, कृष्ण गितांश खेरा, अनमोलप्रीत सिंह, अममोल मल्होत्रा, सनवीर सिंग, संदीप शर्मा, करण कालिया, अभिनव शर्मा, प्रभसिमरन सिंग
महत्वाच्या बातम्या
- काँग्रेस मोठा पक्ष, म्हणजे नक्की काय? शिवसेनेचा सवाल
- शरद पवारांनी केंद्र सरकारला दिला ३० डिसेंबरपर्यंतचा अल्टिमेटम; शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर तोडगा काढा अन्यथा…
- कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी वर्षाचा शेवट गोड! केंद्र सरकारने घेतला महत्वाचा निर्णय
- भारताला एक शक्तीशाली राष्ट्र म्हणून ओळख देण्यात काँग्रेसचे मोलाचे योगदान – बाळासाहेब थोरात
- ऑलिम्पिक पात्र खेळाडू राज्याचे वैभव, मुख्यमंत्र्यांनी थोपटली पाठ
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
