Share

ईडीची नोटिस मिळाल्यानंतर अखेर एकनाथ खडसेंनी सोडले मौन, म्हणाले…

Published On: 

🕒 1 min read

मुंबई:- भाजपमधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेलेले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना अंमलबजावणी संचालनालयाने नोटीस बजावली आहे. या नोटीसनुसार एकनाथ खडसे यांना ३० डिसेंबर रोजी चौकशीसाठी ईडी समोर हजर राहावे लागणार असल्याचे सांगण्यात येत आहे. हा राष्ट्रवादी काँग्रेस आणि एकनाथ खडसे यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे. ईडीची नोटीस मिळाली असल्याचा खुलासा स्वतः एकनाथ खडसे यांनी केला आहे.

देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात भोसरी एमआयडीसी जमीन खरेदी प्रकरणी एकनाथ खडसे यांच्यावर गंभीर आरोप झाले होते. याच प्रकरणातून खडसे यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. आता ईडी मार्फत याच प्रकरणात खडसे यांना नोटीस बजावण्यात आली आहे किंवा कोणते अन्य प्रकरण आहे, याचा उलगडा अद्याप होऊ शकलेला नाही. ही नोटीस म्हणजे खडसे यांना खूप मोठा धक्का आहे, हे मात्र निश्चित आहे.

ईडीची नोटीस आल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रभरातून मला जे फोन येत आहे. त्यातून सहानुभूती व्यक्त केली जात आहे. लोकांना असं वाटते की हा एक प्रकारचा माझ्यावर अन्याय आहे. वारंवार लावलेल्या चौकशा लोकांना आवडलेल्या दिसत नाहीत, पण काही निर्णय असतात, त्या आधीन राहून काम करायचं असतं, असं एकनाथ खडसे यांनी म्हटले आहे.

दरम्यान, एकनाथ खडसे यांना ईडीची नोटीस बजावण्यात आल्याचे वृत्त समोर आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमधून त्यावर तीव्र प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. खडसे यांना नोटीस बजावण्यामागे भाजपचा हात आहे. ही एकप्रकारे भाजपची हुकूमशाही असून याला खडसे भक्कमपणे तोंड देतील. भाजपच्या ईडीला खडसे सीडी लावून उत्तर देतील, असे राष्ट्रवादीचे विधान परिषद सदस्य अमोल मिटकरी यांनी सांगितले.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!