कोल्हापूर : भाजपचे प्रदेशाध्यक्ष व आमदार चंद्रकांत पाटील हे कोथरूड विधानसभा मतदारसंघातून आमदार आहेत. त्यांनी कोल्हापूर सोडून पुण्यातील या मतदारसंघातून निवडणूक लढवल्याने विरोधक त्यांच्यावर अनेकदा टीका करत असतात. २०१९ विधानसभा निवडणुकांमध्ये त्यांनी कोथरूडमधून निवडणूक लढवत विजय मिळवला होता.
विरोधकांनी त्यांच्या या मतदारसंघातून निवडणूक लढण्यावर टीकास्त्र सोडलं होतं. २०१९मध्ये कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्रात आलेल्या पुरावेळी तत्कालीन फडणवीस सरकार परिस्थिती हाताळण्यास अपयशी ठरलं. त्यामुळे तेथील जनतेमध्ये भाजप विरोधात प्रचंड चीड निर्माण झाली होती. त्यामुळेच निवडून न येण्याच्या भीतीने चंद्रकांत पाटलांनी कोथरूडसारखा सुरक्षित मतदारसंघ निवडल्याचा आरोप विरोधकांनी केला होता.
काल चंद्रकांत पाटील यांनी संस्कृती प्रतिष्ठानच्या वतीने माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या ९६ व्या जयंतीनिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरात या कार्यक्रमात चंद्रकांत पाटील यांनी असं काही वक्तव्य केलं ज्यामुळे उपस्थितांमध्ये हशा पिकला. त्यांनी पुण्याचं तोंडभरून कौतुक केलं. ‘पुणे खरंच असं आहे की सर्वांना स्थायिक व्हावंसं वाटतं.’ यानंतर उपस्थितांनी प्रतिसाद देताच ‘देवेंद्रजी मी जाणार, मी कोल्हापूरला परत जाणार. विशेषतः माझे जे विरोधक आहेत त्यांना जरूर सांगा,’ असं म्हणताच सर्वांच्याच चेहऱ्यावर हसू आलं.
पाटलांच्या या विधानाचा संबंध येत्या कोल्हापूर महापालिकेतील निवडणुकांसाठी विरोधकांना एकप्रकारे इशाऱ्याच दिला आहे अशा चर्चा रंगल्या आहेत. आता, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व मंत्री हसन मुश्रीफ यांनी चंद्रकांत पाटील यांना खुलं आव्हानच दिलं आहे. ‘चंद्रकांतदादा तुम्ही कोल्हापूरला या, जनता वाटच पाहत आहे’ असं म्हणत मुश्रीफांनी पाटलांना चिमटा काढण्याची ही संधी देखील सोडलेली नाही. कोल्हापूर जिल्ह्यातील या दोन नेत्यांमध्ये वाकयुद्ध हे सर्वश्रुत आहे.
महत्वाच्या बातम्या
- ज्या ज्या वेळी काँग्रेस सत्तेत येते त्यावेळी धर्मांतरण वाढते : आचार्य तुषार भोसले
- कोरोनाचे गांभीर्य ओळखून कोरेगाव भीमा येथे मानवंदनेसाठी कोणीही गर्दी करू नये : रिपाइं
- अगस्त्य पंड्या ‘सेंटा’च्या रूपात दिसतोय फारच गोड पहा फोटो
- हिंदूत्ववादाचा विसर पडून सत्तेतील शिवसेना आता अजान प्रेमात पडली : शेलार
- चंद्रकात पाटील म्हणजे चंपारण्यातील एक पात्र : वडेट्टीवार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
