🕒 1 min read
मुंबई : मराठा आरक्षणाला अंतरिम स्थगिती मिळाल्यामुळे आरक्षणापासून वंचित राहणाऱ्या एसईबीसी उमेदवारांना आता आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकासाठीच्या आरक्षणाचा लाभ शैक्षणिक प्रवेश आणि सेवाभरतीसाठी होऊ शकेल. त्याकरता त्यांना आर्थिक मागास घटकासाठीचे प्रमाणपत्र देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.
मराठा समाजाने EWS चे प्रमाणपत्र स्वीकारा सांगून ठाकरे सरकारने मराठा समाजाचा अपमान केला आहे. मराठा समाजात काही जण आहेत जे NCP च्या पगारावर आहेत त्यांनी ह्या निर्णयाचे स्वागत केले आहे. १० टक्क्यात काय मिळणार मराठा समाजाला??
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) December 26, 2020
त्याबाबत आता भाजप नेते निलेश राणे यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. त्यांनी ट्विट करत याबाबतीत वक्तव्य केलं आहे. मराठा समाजाने EWS चे प्रमाणपत्र स्वीकारा सांगून ठाकरे सरकारने मराठा समाजाचा अपमान केला आहे. मराठा समाजात काही जण आहेत जे NCP च्या पगारावर आहेत त्यांनी ह्या निर्णयाचे स्वागत केले आहे. १० टक्क्यात काय मिळणार मराठा समाजाला??असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
दरम्यान, आर्थिक दुर्बल घटक अर्थात EWSचा धोरणात्मक निर्णय सरकारनं घेऊ नये, अशी भूमिका खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी घेतली आहे. EWS आरक्षणाला माझा विरोध नाही, पण याचा धोका SEBC ला होणार नाही, याची हमी सरकार घेणार का? असा सवालही संभाजीराजे यांनी केलाय. जर आर्थिक मागास वर्गाच्या सवलतीमुळे मराठा आरक्षणाला धक्का लागल्यास त्याला पूर्णपणे राज्य शासन जबाबदार असेल असं त्यांनी म्हटलं आहे.
दुसऱ्या बाजूला मराठा समाजाची मागणी नसताना वैयक्तिक याचिकेचा आधार घेऊन मराठा समाजाचा EWS मध्ये समावेश करून राज्य सरकारने मराठा आरक्षणाचा घात केला आहे. त्याचप्रमाणे केंद्र सरकारनेही मराठा समाजाची फसवणूक केल्याचा आरोप मराठा क्रांती मोर्चाने केला आहे.श्रीमंत कोकाटे, विकास पासलकर, राहुल पोकळे, राजेंद्र कुंजीर आदी पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत पुण्यात भुमिका मांडली आहे.
महत्वाच्या बातम्या
- …म्हणून आशिष शेलारांनी केले मुख्यमंत्र्यांचे धाकटे चिरंजीव तेजस ठाकरेंचे तोंडभरून कौतुक
- मध्य प्रदेशात लव्ह जिहाद विधेयकाला मंत्रिमंडळात मंजुरी
- जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात अण्णा हजारेंचे उपोषण निश्चित
- हिंदूत्ववादाचा विसर पडून सत्तेतील शिवसेना आता अजान प्रेमात पडली : शेलार
- अखेर मनसे पुढे अॅमेझॉन झुकलं; मराठीचा भाषेचा लवकरच देणार पर्याय!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
