Share

‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा शेतकऱ्यांच्या जमिनी उद्योजकांच्या घशात घालण्याचा डाव आहे’

Published On: 

🕒 1 min read

नाशिक : केंद्र सरकारनं आणलेल्या तीनही कृषी सुधारणा कायद्यांच्या विरोधात गेल्या 25 दिवसांपासून दिल्लीच्या सीमेवर ठिय्या देणाऱ्या शेतकऱ्यांना साथ देण्यासाठी महाराष्ट्रातील हजारो शेतकऱ्यांनी काल नाशिकहून राजधानी दिल्लीच्या दिशेने कूच केलं. अखिल भारतीय किसान सभेच्या नेतृत्वात राज्यभरातील हजारो शेतकरी सोमवारी नाशिकमधील गोल्फ क्लब मैदानावर जमा झाले होते.

यावेळी आंदोलकांनी केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी केली. नंतर या शेतकऱ्यांनी अखिल भारतीय किसान सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष अशोक ढवळे यांच्या नेतृत्वात आणि केरळचे खासदार के. के. रागेश यांच्या प्रमुख उपस्थित दिल्लीकडे प्रस्थान केलं. यावेळी आमदार जयंत पाटील, माजी आमदार नरसय्या आडम, माजी आमदार जे, पी. गावीत. सीटूचे राष्ट्रीय उपाध्यक्ष डी. एल. कराड, किसान सभेचे राज्य अध्यक्ष किसान गुज्जर, सचीव अजित नवले, राजु देसले, सुनील मालुसरे आदि विविध संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी शेतकऱ्यांच्या जमिनी उद्योजकांच्या घशात घालण्याचा डाव घालत आहे. सरकार जर धान्यच खरेदी करणार नाही, तर रेशन व्यवस्था मोडीत निघून गोरगरीब जनतेवर उपासमारीची वेळ येणार आहे. शेतकरी व कामगारांना डावलून कोणी पुढे जाऊ शकत नाही. विजेचे खासगीकरण करून देशाला विकण्याचा डाव केंद्र सरकार करत असल्याचे कामगार नेते डॉ. डी. एल. कराड यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!