🕒 1 min read
मुंबई:- शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी आज राज्यव्यापी बैठक बोलावली आहे. या बैठकीला मराठा समाजाच्या पहिल्या फळीतील सर्व नेत्यांना बोलावण्यात आलं आहे. राज्य सरकारकडून सर्वोच्च न्यायालयात आतापर्यंत नीट बाजू मांडण्यात आली नाही. 25 जानेवारीपासून अंतिम सुनावणी आहे. जर सरकारची हीच भूमिका राहिली तर मराठा समाजाबाबत संभ्रम निर्माण होण्याची शक्यता आहे. सरकारला माहिती देण्यासाठी ही बैठक आयोजित केल्याचं विनायक मेटे यांनी सांगितलं आहे.
सरकार मराठा समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहे. आम्हाला एकत्र येऊ देत नाही. जे लोक आज बैठकीला येणार नाहीत. त्यामागे सरकार जबाबदार असेल. 3 पक्षाचं सरकार एकत्र येत असेल तर मराठा समाजानेही एकत्र यायला हवं. जर आम्ही एकत्र आलो नाही तर समाजाप्रतिचं कोरडं प्रेम दिसून येईल, असं मत मेटे यांनी व्यक्त केलं आहे.
दरम्यान, पवारांनी देशातील इतर गोष्टींमध्ये लक्ष घातलं. पण मराठा आरक्षणाकडे मात्र दुर्लक्ष केलं, असा आरोपही मेटे यांनी केला आहे. 25 जानेवारीपूर्वी त्यांनी लक्ष घालावं. सगळ्यांना एकत्र आणत नवी रणनिती आखावी, अशी मागणी मेटे यांनी केली आहे. मराठा समाजातील नेते एकत्र आले नाहीत, तर समाजाचं नुकसान होणार असल्याचं मत मेटे यांनी व्यक्त केलं आहे.
महत्वाच्या बातम्या
- भाजपमधील काही आमदार राष्ट्रवादीत जाणार? मलिक-भुजबळ म्हणाले…
- ‘रशियाचे अध्यक्ष पुतिन यांच्या प्रमाणे वागू नये’; नव्या संसद भवनावरून राऊतांची मोदींवर टीका
- अकाली दल-शिवसेनेच्या जाण्याने एनडीएमध्ये रिकामी झालेली जागा भरून काढणार ‘हा’ पक्ष ?
- मा. गो. वैद्य यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून शोक व्यक्त
- पुत्र मोह सोडा, लोकशाही वाचवा; ‘या’ नेत्याने सोनिया गांधींना दिला सल्ला!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
