🕒 1 min read
अहमदनगर/ऋषिकेश घोगरे:- राज्यातील मुदत संपणार्या आणि लांबणीवर पडलेल्या 14 हजार 234 ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा बिगुल वाजला आहे. निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून 15 जानेवारीला मतदान होत आहे. परंतु, आता सरपंचपदाचे आरक्षण मतदानानंतर काढण्याचा आदेश ग्रामविकास विभागाने सर्व जिल्हाधिकार्यांना दिला आहे.
अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतीच्या निवडणुका १५ जानेवारीला होत असून अकोले विधानसभा मतदारसंघातील ज्या ग्रामपंचायती बिनविरोध निवडणूक करून शासनाच्या खर्चासह गावात एकात्मता आणि प्रशासनावरचा ताण कमी करतील त्या ग्रामपंचायतींना आमदार निधीतून 26 लाखांचा निधी देण्याची घोषणा आमदार किरण लहामटे यांनी केली आहे. त्यामुळे आता गावागावात ही निवडणूक बिनविरोध होण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत.
दरम्यान, नगर जिल्ह्यात राष्ट्रवादी काॅंग्रेसचे आमदार निलेश लंके यांनी यापूर्वीच २५ लाखांचे बक्षिस पारनेर विधानसभा मतदारसंघात जाहीर केले आहे. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या मार्गदर्शनाखाली राळेगणसिद्धी या गावाची निवडणूक बिनविरोध करण्याचा निर्णय झाला असून, इतरही गावे बिनविरोध करण्याचा निर्णय लंके यांनी घेतला आहे.
महत्वाच्या बातम्या
- शेतकऱ्यांशी कुठल्याही मुद्यावर चर्चा करायला केंद्र सरकार तयार : मोदी
- ‘रशियाचे अध्यक्ष पुतिन यांच्या प्रमाणे वागू नये’; नव्या संसद भवनावरून राऊतांची मोदींवर टीका
- करोनाची लस बनवणाऱ्या कंपन्यांना सरकारनं कायदेशीर संरक्षण द्यावं – पुनावाला
- मा. गो. वैद्य यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून शोक व्यक्त
- पुत्र मोह सोडा, लोकशाही वाचवा; ‘या’ नेत्याने सोनिया गांधींना दिला सल्ला!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
