🕒 1 min read
मुंबई : गेल्या वर्ष भरापासून जगभरात कोरोना या विषाणूने थैमान घटल असून अनेकांचे या आजाराने बळी गेले आहेत. राज्यासह देशात देखील कोरोनाने कहर माजवला आहे. सध्या कोरोनाचे भय कमी झाले असले तरी संकट मात्र कायम आहे. काही दिवसांपासून कोरोना लसींबाबत दिलासादायक वृत्त हाती येत असून नुकतंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियासह हैद्राबाद व अहमदाबादमधील लस संशोधन करणाऱ्या कंपन्यांना भेट दिली होती.
यानंतर, नेमकी लस कधी येणार? सर्वसामन्यांना परवडणार का? प्राधान्यक्रम कसा असेल? कितपत उपायकारक असेल? दुष्परिणाम असतील का? हे व असे कित्येक प्रश्न निर्माण झाले आहेत. कोरोनाच्या लसीसंदर्भातील ही प्रतिक्षा लवकरच संपणार असल्याचे आशादायक चित्र सध्या तरी दिसत आहे. युनायटेड किंग्डम, रशिया आणि चीनसारख्या देशांनी आपआपल्या देशातील नागरिकांना करोनाची लस देण्यासंदर्भातील मोहिम सुरु केली आहे.
आता भारताकडे सर्वांचं लक्ष असून देशात सद्या मोठ्या प्रमाणावर लसींचं उत्पादन केलं जात आहे. त्यामुळे देशातील नागरिकांना लस कधी मिळणार याबाबत आता उत्सुकता निर्माण झाली आहे. दरम्यान, जानेवारीमध्ये महाराष्ट्रात लसीकरण मोहीम हातात घेण्यात येऊ शकतं असं विधान राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केलं आहे.
केंद्र सरकारने हिरवा कंदील दाखवल्यानंतर जानेवारीमध्ये लसीकरण सुरु करू शकतो अशी शक्यता आहे. तर, पहिल्या टप्प्यात तब्बल ३ कोटी नागरिकांना लस देण्यासाठीचे मायक्रो-प्लॅनिंग देखील पूर्ण झाल्याची माहिती राजेश टोपे यांनी दिली आहे. लस देण्यासाठी कार्यपद्धती आहे. ज्या तारखेला लस द्यायची आहे त्या व्यक्तीला मेसेज मिळणार, त्यांनंतर त्याची ओळख पटवून त्याला लस दिली जाणार असल्याचे ते म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
- कंगनाच ट्विटर अकाऊंट बंद करण्यासाठी थेट उच्च न्यायालयात याचिका, तर राज्य सरकारचा विरोध
- जयंत पाटील म्हणतात…शिवसेनेच्या पराभवाची येत्या काळात भरपाई करणार!
- रयतच्या बड्या अधिकाऱ्याचा पुण्यात राजीनामा; परिस्थिती हाताळण्यासाठी शरद पवार थेट साताऱ्यात
- महाविकास आघाडीत तणाव वाढणार? काँग्रेस नेत्याने दिला स्वबळावर लढण्याचा नारा
- केजरीवालांनी दिल्ली विधानसभेत कृषी कायद्यांच्या प्रतिचे केले तुकडे-तुकडे
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

