Share

कंगनाच ट्विटर अकाऊंट बंद करण्यासाठी थेट उच्च न्यायालयात याचिका, तर राज्य सरकारचा विरोध

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री कंगना रानौत आणि राज्य सरकार यांच्यात झालेला वाद हा चांगलाच पेटला होता. अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूनंतर कंगणारे मुंबई पोलिसांच्या तपासासह राज्य सरकारवर ताशेरे ओढले होते. यानंतर हा वाद शिवसेना विरुद्ध कंगना असा झाला होता. हा वाद इतका विकोपाला गेला की कंगनाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा एकेरी उल्लेख देखील केला.

कंगना तिच्या प्रतिक्रिया ट्विटरमार्फत देत असते. ती ट्विटरवर जास्त ऍक्टिव्ह असल्याचे नेहमीच दिसले. याबाबतीत देखील ती ट्विटरमार्फतच आपल्या प्रतिक्रिया देत होती. यामुळेच उच्च न्यायालयात एका व्यक्तीने थेट कंगनाचे ट्विटर अकाऊंटच बंद करण्यात यावे यासाठी धाव घेतली होती. त्याने कंगनाची अकाऊंट ट्विटरवरून हटवावे यासाठी याचिका दाखल केली आहे.

दरम्यान, राज्य सरकारने मात्र या याचिकेला विरोध केला असून कंगनाच्या वैयक्तिक अधिकारांवर गदा आणता येणार नसल्याचं म्हटलं आहे. सद्या देखील कंगना आणि अभिनेता दिलजीत यांच्यात ट्विटर वॉर सुरु आहे. कंगनाने प्रियांका आणि दिलजीतला टॅग करत ट्विट लिहिले होते की, ‘शेतकऱ्यांच्या आंदोलनासाठी येणार खर्च ७० हजार कोटी आहे. आंदोलनामुळे इंडस्ट्री आणि छोट्या फॅक्टऱ्यांची इकॉनॉमी संथ झाली आहे. याने दंगे भडकू शकतात. दिलजीत आणि प्रियांका तुम्हाला समजतंय ना….आपल्या अॅक्शनचे गंभीर परिणाम भोगावे लागू शकतात. प्लीज मला सांगा..कोण याची भरपाई करेल?’. यानंतर दिलजीतने देखील कंगनाला चोख उत्तर दिलं होतं.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!