Share

जयंत पाटील म्हणतात…शिवसेनेच्या पराभवाची येत्या काळात भरपाई करणार!

Published On: 

🕒 1 min read

सातारा : नुकत्याच पार पडलेल्या पदवीधर व शिक्षक आमदार निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला चांगलं यश मिळवता आलं. भाजपचा बालेकिल्ला समजला जाणारा पुणे व गेली कित्येक टर्म भाजपचा दबदबा असलेला नागपूर मतदारसंघ देखील यंदा महाविकास आघाडीने स्वतःच्या ताब्यात घेतला आहे.

मात्र, या आघाडीचा फायदा राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसलाच झाल्याचं दिसून आलं असून शिवसेनेला मात्र या निवडणुकांमध्ये आपलं खातं देखील उघडता आलं नाही. अमरावती शिक्षक मतदारसंघामध्ये शिवसेनेला पराभव स्वीकारावा लागला होता. यानंतर, भाजप नेत्यांनी शिवसेनेला लक्ष्य केलं होतं. मुख्यमंत्री शिवसेनेचे असताना पक्षाला एकही जागा न मिळाल्याने त्यांच्यावर टीका करण्यात येत होती.

आता आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाष्य करत जी काही कमी पदवीधर, शिक्षक निवडणुकांमध्ये राहिली होती ती येत्या काळात भरून काढणार असल्याचं सांगितलं आहे. ते म्हणाले, ‘पदवीधर, शिक्षक निवडणुकीत शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जरी कमी जास्त झालं असले तरी भविष्यकाळात त्याची भरपाई करणार आहे.’ त्यांनी साताऱ्यात पत्रकारांशी संवाद साधला असता ही प्रतिक्रिया दिली आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!