Share

रयतच्या बड्या अधिकाऱ्याचा पुण्यात राजीनामा; परिस्थिती हाताळण्यासाठी शरद पवार थेट साताऱ्यात

Published On: 

🕒 1 min read

पुणे : रयत शिक्षण संस्थेचं महाराष्ट्रातील जाळं हे फार मोठं आहे. आशिया खंडातील सर्वात मोठ्या शिक्षण संस्थांमध्ये रयतचं नाव घेतलं जातं. आता ही शिक्षण संस्था वेगळ्या कारणामुळे चर्चेत आली आहे. रयत शिक्षण संस्थेचे माजी सचिव कऱ्हाळे यांनी पुण्यात राजीनामा दिल्यानं राजकीयसह शैक्षणिक वर्तुळात खळबळ उडाली.

यानंतर उमटणारे प्रतिसाद व इतर काही प्रतिकूल परिणाम होण्याआधीच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पाऊले उचलल्याचं बोललं जात आहे. शरद पवार आज सातारा दौऱ्यावर आहेत. यामागे माजी सचिव कऱ्हाळे यांच्या राजीनाम्याचं कारण असल्याचं देखील समजत आहे. पवारांच्या नेतृत्त्वात आज साताऱ्यात रयत शिक्षण संस्थेची महत्त्वाची बैठक घेण्यात येणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं. या बैठकीला रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन अनिल पाटील आणि रयतचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

कऱ्हाळे हे मागील तीन वर्षांपासून पुण्यातील रयत शिक्षण संस्थेत कार्यरत होते. त्यांच्या अचानक राजीनाम्यामुळे शैक्षणिक क्षेत्रात खळबळ उडाली असून अनेक उलट-सुलट चर्चांना सुरुवात झाली आहे.  त्यामुळे साताऱ्यात होणाऱ्या या बैठकीकडे संस्थापातळीवर सर्वांचे लक्ष लागले आहे. डॅमेज कंट्रोलसाठी पवार काय रणनीती आखणार यावर उत्सुकता निर्माण झाली आहे. यासंदर्भात न्यूज १८ लोकमतने वृत्त दिलं आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!