🕒 1 min read
मुंबई:- आरेतील मेट्रो कारशेड कांजूरमार्गला हलवण्यावरून ठाकरे सरकार आणि भाजपमध्ये वाद पेटलेला आहे. आता मुंबई उच्च न्यायालयाने ठाकरे सरकारला जोरदार धक्का दिला आहे. कांजूरमार्गमधील मेट्रो कारशेडचे काम थांबवण्याचे आदेशच न्यायालयाने दिले आहे. मुंबई मेट्रो-3च्या कांजूरमार्गमधल्या कारशेडच्या कामावर मुंबई उच्च न्यायालयानं स्थगिती आणली आहे. सध्या परिस्थिती जैसे थे ठेवण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत.
न्यायालयानं दिलेल्या आदेशानंतर आता भाजपाकडून ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली जात आहे. भाजपा नेत्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या महाविकास आघाडी सरकारवर टीका करण्यास सुरुवात केली आहे. न्यायालयाच्या या निर्णयावर भाजप नेते आमदार राम कदम यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे.
बाल हट्टा पोटी मुंबईकरांचे साडे पाच हजार कोटी खड्ड्यात सरकारने घातले, असं ट्विट राम कदम यांनी केलं आहे.
बाल हट्टा पोटी मुंबईकरांचे साडे पाच हजार कोटी खड्ड्यात #MVA सरकारने घातले #MetroCarShed #Metro
— Ram Kadam (@ramkadam) December 16, 2020
दरम्यान, न्यायालयाने दिलेल्या या निर्णयानंतर विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील ठाकरे सरकारवर निशाणा साधला. विकासकामांमध्ये कोणत्याही प्रकारची हार जीत करू नये. मुंबईच्या विकासासाठी काम हे केलं पाहिजे. मेट्रोच्या कामासाठी लाणारा पैसा हा जनतेचा, सर्वांचाच आहे. कारशेडचं काम त्वरित सुरू न केल्यास प्रकल्प २०२४ पर्यंत लांबेल. राज्य सरकारचा त्याच जागेसाठी अटट्हास का आहे?, असा सवाल फडणवीस यांनी केला आहे.
महत्वाच्या बातम्या
- विनाआरसा गाडी चालवताय, मग तुम्हाला होऊ शकते शिक्षा !
- ज्याला मेसेज येणार, त्यालाच कोरोनाची लस मिळणार; राजेश टोपेंची माहिती
- पोलीस उपनिरीक्षक पदाच्या मैदानी चाचण्या रखडल्या! भावी अधिकाऱ्यांकडे प्रशासनाचं दुर्लक्ष
- रिलायन्स जिओने 4G डाउनलोड स्पीडमध्ये पुन्हा एकदा बाजी मारली
- शेतकरी आंदोलनाच्या मुद्द्यावरून प्रियंका गांधी यांची मोदी सरकावर तिखट शब्दात टीका
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

