Share

सत्तेची हवा डोक्यात जाता कामा नये; देवेंद्र फडणवीस यांचा ठाकरेंना टोला

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : राज्य विधिमंडळाच्या दोन दिवसीय हिवाळी अधिवेशनाला कालपासून सुरुवात झाली आहे. विरोधकांनी हे अधिवेशन सुरु होण्याआधीच सरकारला घेरण्यासाठी मोर्चेबांधणी केल्याचं दिसून आलं होतं. जनतेच्या प्रश्नासाठी २ दिवसांचं अधिवेशन पुरेसं नाही त्यामुळे हे या अधिवेशनाचा कालावधी वाढवावा अशी मागणी केली जात होती. यावर खुद्द विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांनी देखील अधिवेशन कालावधीवर नाराजी व्यक्त केली होती.

दरम्यान, कालपासून सुरु झालेल्या या अधिवेशनात विरोधक चांगलेच आक्रमक झाल्याचे दिसून आले होते. विरोधकांचा हा बाणा आजही कायम असल्याचं दिसून येत आहे. हिवाळी अधिवेशनात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली.

सत्तेची हवा डोक्यात जाता कामा नये असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरेंना लगावला आहे. कुणी विरोधात बोललं तर त्याला तुरुंगात टाकलं पाहिजे असं नाही असंही ते म्हणाले. अर्णब गोस्वामींविरोधात जुन्या केसेसच्या आधारावर कारवाई करण्यात आली असं म्हणत त्यांनी ठाकरे सरकारचा विरोध केला.

हे कायद्याचे राज्य आहे. पाकिस्तान नाही. लोकशाही आहे. तानाशाही नाही. तुम्ही हे राज्य २५ वर्षे चालवा किंवा २७ वर्षे चालवा. पण हे कायद्याने चालवा, असा सल्ला देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीला दिला.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!