Share

विधान परिषदेवरील नामनिर्देशित सदस्यांच्या नावांची घोषणा होण्याआधी विरोध चुकीचा : कुंभकोणी

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : विधान परिषदेवरील नामनिर्देशित सदस्यांच्या नावांची राज्यपालांकडून अद्याप घोषणा झालेली नाही. अशा वेळी या नावांना आधीच विरोध करणे चुकीचे आहे. त्यामुळे कायदेशीर तरतुदींनुसार याचिकेला उत्तर देण्यास आम्ही बांधील नसल्याचा दावा राज्य सरकारने उच्च न्यायालयात काल केला. तसेच याविरोधात केलेली याचिका फेटाळण्याची मागणी केली. न्यायालयाने मात्र सरकारला या प्रकरणी प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

एकनाथ खडसे, राजू शेट्टी, यशपाल भिंगे, रजनी पाटील, सचिन सावंत, सय्यद मुझफ्फर हुसैन, चंद्रकांत रघुवंशी आणि विजय करंजकर या आठ जणांच्या नावाला आक्षेप घेणारी याचिका दिलीप आगाळे तसेच शिवाजी पाटील यांनी  सतीश तळेकर यांच्यामार्फत केली आहे. तसेच राज्यपालांना त्यांची नेमणूक करण्यास मज्जाव करावा, अशी मागणीही केली आहे.

न्यायमूर्ती रमेश धानुका यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर शुक्रवारी या प्रकरणी सुनावणी झाली. त्या वेळी महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांनी राज्य सरकारच्या वतीने उपरोक्त भूमिका मांडली.न्यायालयानं आता १८ डिसेंबरला पुढील सुनावणी ठेवली असून राज्य सरकारला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!