Share

महानगरपालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवत रामदास आठवलेंचा राज्यव्यापी दौरा सुरू

Published On: 

🕒 1 min read

 मुंबई  – राज्यात आगामी वर्षभरात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका; मुंबई नागपूर सारख्या महत्वाच्या महापालिका निवडणुकांमध्ये रिपब्लिकन पक्षाची कामगिरी चांगली होण्यासाठीराज्यात रिपब्लिकन पक्षाच्या झालेल्या सदस्य नोंदणीचा आढावा घेण्यासाठी आणि पक्ष संघटनेच्या बांधणीसाठी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री रामदास आठवले यांनी राज्यात विभाग निहाय  दौरा सुरू केला आहे.

काल रिपब्लिकन पक्षाच्या मुंबई प्रदेशची बैठक घेतल्या नंतर रविवार दि. 13 डिसेंबर रोजी दुपारी 1 वाजता नागपूरच्या सामाजिक न्याय भवन येथे रिपब्लिकन पक्षाच्या विदर्भ विभागाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. यावेळी आझाद विदर्भ सेना या संघटनेचे रिपब्लिकन पक्षात विलिनीकरण करण्यात येणार असून या संघटनेचे प्रमुख आशिष कुमार बुराडे हे रिपाइं मध्ये प्रवेश करणार आहेत.

मुंबई,नागपूर नंतर रिपाइंच्या पश्चिम महाराष्ट्र विभागाची बैठक पुणे येथे दि. 27 डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आली असून त्यानंतर रिपाइं च्या उत्तर महाराष्ट्राची बैठक  शिर्डी येथे दि.28 डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आली आहे. त्यानंतर  रिपाइंच्या मराठावाडा विभागाची बैठक औरंगाबाद येथे दि.29 डिसेंबर रोजी घेण्यात येणार आहे. त्यानंतर रिपाइं च्या कोकण विभागाची बैठक पनवेल येथे दि.30 डिसेंबर घेण्यात येणार. त्यानंतर ठाणे प्रदेशची बैठक दि. 3 जानेवारी रोजी सायलंट रिसॉर्ट मनोर पालघर येथे घेण्यात येणार आहे. या सर्व विभागीय बैठकांना केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले मार्गदर्शन करणार आहेत.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!