🕒 1 min read
मुंबई : केंद्र सरकारने घाईघाईत पारित केलेल्या नव्या जाचक कृषी कायद्यांच्या विरोधात देशभरातील शेतकऱ्यांनी एल्गार पुकारला आहे. गेल्या 14 दिवसांपासून राजधानी दिल्लीत आंदोलन करणाऱ्या शेतकरी आणि सरकारमध्ये झालेल्या पाच बैठकांनंतरही कोणताही निकाल लागलेला नाही. आज शेतकरी आणि सरकार यांच्यात आणखी होणारी बैठक शेतकऱ्यांच्या भारत बंदला मिळालेला पाठींबा पाहता सरकारने नमतं घेत एक दिवसा आधीच म्हणजेच 8 डिसेंबरलाच घेतली.
या कृषी विधेयकांवरून राज्यात महाविकास आघाडी विरुद्ध भाजपमध्ये आरोप-प्रत्यारोप रंगले आहेत. आता, भाजप नेते अवधूत वाघ यांनी नाशिक येथील शरदचंद्र पवार कृषी उत्पन्न बाजार समितीने शेतकऱ्यांच्या मालावर अधिकचा सेस लावल्याचं सांगत हा प्रकार समोर आणला आहे. अशा पद्धतीने शेतकऱ्यांना लुबाडलं जात असल्याचं सांगत त्यांनी नव्या कृषी कायद्याची गरज सांगितली आहे.
‘नाशिक मधील शरदचंद्र पवार कृषी उत्पन्न बाजार समितीने कालपासून शेतकऱ्यांच्या मालावर १% सेस लावला याला शेतकरी/व्यापाऱ्यांनी विरोध केला. शेतकऱ्यांच्या पैशावर मजा मारणारी ही बांडगूळ नष्ट व्हावीत म्हणून तर मा. पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजींनी कृषी विषयक विधेयक आणले.’ असं ट्विट करत अवधूत वाघ यांनी कृषी कायद्याचा विरोध करणाऱ्यांवर घणाघात केला आहे.
नाशिक मधील शरदचंद्र पवार कृषी उत्पन्न बाजार समितीने कालपासून शेतकऱ्यांच्या मालावर १% सेस लावला
याला शेतकरी/व्यापाऱ्यांनी विरोध केला.
शेतकऱ्यांच्या पैशावर मजा मारणारी ही बांडगूळ नष्ट व्हावीत म्हणून तर मा. पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजींनी कृषी विषयक विधेयक आणले. #FarmersWithModi— Avadhut Wagh अवधूत सुशीला रमाकांत वाघ (@Avadhutwaghbjp) December 9, 2020
महत्वाच्या बातम्या
- देशातील असंतोष विझविण्याऐवजी तो भडकलेला ठेवण्यात सरकारला रस आहे : शिवसेना
- तृप्ती देसाईंना शिर्डीमध्ये प्रवेशबंदी! शिर्डी पोलीसांनी तृप्ती देसाईंना दिली नोटीस
- नवनवीन प्रगत व्यवसाय अभ्यासक्रम सुरु होण्यासाठी प्रयत्न करणार : शंभूराज देसाई
- काँग्रेस पक्ष महाविकास आघाडीचा पाठिंबा काढून राज्य सरकार पडणार; केंद्रीय मंत्र्याचा दावा
- खा. शरद पवारांच्या नावाने महाविकास आघाडी सरकार लागू करणार योजना
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

