🕒 1 min read
पुणे- विधानपरिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील पाच जागांसाठी आज मतदान होतं आहे. विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडी आणि भाजप या निवडणुकीच्या निमित्ताने पहिल्यांदा समोरासमोर लढत आहेत. राज्यातील महाविकास आघाडी सरकार आम्हाला पाडण्यात अजिबात रस नाही. त्यांच्यातील समन्वयाच्या अभावामुळे सर्वच आघाड्यांवर ते अपयशी ठरले आहे. त्यामुळे हे सरकार त्यांचाच वजनामुळे पडेल, असे मत पुणे शहराचे खासदार गिरीश बापट यांनी व्यक्त केले आहे. खासदार गिरीश बापट यांनी पुणे पदवीधर निवडणुकीत आपल्या कुटुंबीयांसह मतदान हक्क बजावला. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. तसेच यावेळी अनेक विषयांवर भाष्यदेखील केले.
बॉलिवूड उत्तर प्रदेशात हलविण्याच्या हालचाली सुरू आहेत. त्यासाठी योगी आदित्यनाथ महाराष्ट्रात आले आहेत. त्यावर तुमची प्रतिक्रिया काय? असा सवाल बापट यांना करण्यात आला. तेव्हा, योगी आदित्यनाथ आज मुंबई दौऱ्यावर आहेत. बॉलिवूड असो किंवा इतर सांस्कृतिक क्षेत्र यात काम करायला मोठी संधी आहे. अशी कामे झाली तर आनंद व्यक्त करायला हवा, दुःख व्यक्त करण्याचे कारण नाही. योगी आदित्यनाथ यांच उत्तर प्रदेशातले काम हे अभिनंदनीय आहे, असे बापट म्हणाले.
हे अपयशी सरकार आहे. कोरोनाच्या कामातही हे सरकार अपयशी झाले असून ठाकरे सरकार सपशेल नापास झाले आहे. हे सरकार पाडण्याची गरज नाही. सरकार आपल्याच वजनाने आपोआप पडेल, असा दावाही बापट यांनी केला आहे. पदवीधरांच्या निवडणुकीपासून राज्यात नव्या परिवर्तनाला सुरुवात होणार असल्याचा दावाही त्यांनी केला.
महत्त्वाच्या बातम्या
- चेन्नई, मुंबईसह 16 ठिकाणी प्राप्तिकर विभागाचे छापे,450 कोटींपेक्षा जास्त बेहिशेबी उत्पन्न सापडले
- आंदोलनाला पाठिंबा देत कुस्तीपटूंनी देखील शेतकऱ्यांसाठी थोपटले दंड !
- ममता सरकार १५ डिसेंबरपर्यंत कोसळणार;६२ आमदार भाजपच्या संपर्कात : सौमित्र खान
- ‘ही सरकारच्या कामांची वर्षपूर्ती नव्हे तर लोकोपयोगी कामांचे विद्यमान सरकारने घातलेले वर्षश्राद्ध’
- शिवसेनेतर्फे लहान मुलांसाठी अजान पठण स्पर्धेचं आयोजन; स्पर्धेवरून भाजप-शिवसेनेत वादंग
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
