🕒 1 min read
कोल्हापूर – महाराष्ट्रात मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या अंतरिम स्थगितीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं शैक्षणिक प्रवेश प्रक्रिया पार पाडण्याचा निर्णय नुकताच घेतला आहे. 2020-21 या शैक्षणिक वर्षाच्या प्रवेशाबाबत महाराष्ट्र राज्य सरकारनं शासन निर्णय जारी केला आहे.
त्यानुसार सर्व शैक्षणिक संस्थांमधील 9 सप्टेंबर 2020 नंतरची सर्व प्रवेश प्रक्रिया एसईबीसी म्हणजेच सामाजिक आणि शैक्षणिक मागास प्रवर्गासाठीचे आरक्षण न ठेवता पार पाडण्याचे निर्देश सर्व प्रशासकीय विभागांना देण्यात आले आहेत. 9 सप्टेंबर 2020 पूर्वी एसईबीसी प्रवर्गातून प्रवेशासाठी अर्ज केला असेल मात्र अद्याप प्रवेश दिला गेला नसेल तर अशा एसईबीसी विद्यार्थ्यांना खुल्या प्रवर्गातून प्रवेश देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
दरम्यान,या पार्श्वभूमीवर “राज्य सरकारचा मराठा समाजाप्रति असलेला द्वेष सारखा दिसून येत आहे. सरकार पुन्हा पुन्हा मराठा विद्यार्थ्यांचा विश्वासघात करत आहे. यांचे सर्वच निर्णय मराठा समाजासाठी धक्कादायक ठरत आहेत. सर्व संघटनांनी एकत्र येऊन जर निर्णय घेतला, तर भाजपा या आंदोलनाचं नेतृत्व करण्यास तयार आहे.” असं वक्तव्य भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे.
राज्य सरकारचा मराठा समाजाप्रति असलेला द्वेष सारखा दिसून येत आहे. सरकार पुन्हा पुन्हा मराठा विद्यार्थ्यांचा विश्वासघात करत आहे. यांचे सर्वच निर्णय मराठा समाजासाठी धक्कादायक ठरत आहेत. सर्व संघटनांनी एकत्र येऊन जर निर्णय घेतला, तर भाजपा या आंदोलनाचं नेतृत्व करण्यास तयार आहे. pic.twitter.com/IG5XNaI0Jj
— Chandrakant Patil (@ChDadaPatil) November 25, 2020
पाटील यांनी केलेल्या या मागणीवर पक्ष सोडून जर कुणी नेतृत्व करण्यासाठी येत असेल तर मराठा समाज त्यांचे स्वागत करू पण मराठा समाजाच्या आरक्षणाचं नेतृत्व कुठल्याही पक्षाच्या हातात देणार नाही अशी भुमिका मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक दिलीप पाटील यांनी घेतली आहे.ते कोल्हापुरात बोलत होते. मराठा समाजाच्या तरुणांचे आरक्षण वगळून जी नोकर भरती सुरू केली आहे त्याला मराठा समाजाचा विरोध आहे. आरक्षणासाठी 8 डिसेंबर रोजी राज्यभरातील तरुणांना घेऊन विधानभवनावर मोर्चा काढणार आहे, अशी प्रतिक्रिया दिलीप पाटील यांनी दिली.
महत्वाच्या बातम्या
- चेन्नई, मुंबईसह 16 ठिकाणी प्राप्तिकर विभागाचे छापे,450 कोटींपेक्षा जास्त बेहिशेबी उत्पन्न सापडले
- आंदोलनाला पाठिंबा देत कुस्तीपटूंनी देखील शेतकऱ्यांसाठी थोपटले दंड !
- ममता सरकार १५ डिसेंबरपर्यंत कोसळणार;६२ आमदार भाजपच्या संपर्कात : सौमित्र खान
- ‘ही सरकारच्या कामांची वर्षपूर्ती नव्हे तर लोकोपयोगी कामांचे विद्यमान सरकारने घातलेले वर्षश्राद्ध’
- शिवसेनेतर्फे लहान मुलांसाठी अजान पठण स्पर्धेचं आयोजन; स्पर्धेवरून भाजप-शिवसेनेत वादंग
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
