Share

मराठा आरक्षण : फडणवीसांनी करुन दाखवलं, पण त्यांना नावं ठेवली : उदयनराजे भोसले

Published On: 

सातारा : माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी करुन दाखवलं. पण त्यांना नाव ठेवली. मग आता तुम्ही सत्तेत आहात ना, तर मग ते करुन दाखवा, अशी आक्रमक भूमिका खासदार उदयनराजे भोसले यांनी घेतली. भोसले यांनी मराठा आरक्षणप्रश्नी पत्रकार परिषद घेऊन राज्य सरकारवर ताशेरे ओढले आहेत. त्यांनी मराठा आरक्षणाचा प्रश्न लवकरात लवकर सोडवावा अशी मागणी केली आहे.

भोसले म्हणाले, देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आऱक्षणासाठी काम केलं तरीही आपण त्यांनाच नावं ठेवतो. आता तुम्ही सत्तेत आहात तर ते पुढं न्यावं. तुम्हाला जर हे जमणार नसेल तर पुन्हा फडणवीसांच्या हाती सत्ता द्या, मी आरक्षण मिळवून देईन, असंही उदयनराजे यावेळी म्हणाले.

यावेळी बोलताना भोसले यांनी जातीचं राजकारण करायचं असेल तर राजीनामा द्या आणि घरी बसा,’ असा इशाराच राज्यकर्त्यांना दिला आहे. ‘आरक्षणाचा प्रश्न हा सुटणारच. मराठा समाजाला आरक्षण मिळणार असून सद्या होणाऱ्या प्रवेशांमध्ये देखील मराठा विद्यार्थ्यांना राखीव जागा ठेवण्यात याव्यात’ अशी मागणी देखील उदयनराजेंनी केली आहे.

ते म्हणाले की, या प्रश्नाच्या मुळापर्यंत जात नाही तोपर्यंत मराठा आरक्षण निर्णय मार्गी लागणार नाही. आता पुढची पिढी विचारेल तुम्ही काय केले? प्रत्येकाला आरक्षण दिले. मराठा समाजाला आरक्षण का दिले नाही. त्यावेळच्या मुख्यमंत्र्यांनी का विचार केला नाही असा आरोपही त्यांनी केला.

मराठा आरक्षण प्रश्नावर घेतलेल्या पत्रकार परिषदेत उदयनराजेंनी अप्रत्यक्षपणे शरद पवारांवर निशाणा साधला. ‘मराठा समाजाच्या आरक्षणाचा विषय अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत. त्यामुळे गेली अनेक वर्षे सत्तेत असलेले या प्रश्नाला जबाबदार आहेत. मराठा समाजावर अन्याय करणाऱ्यांनी आता समाजाच्या प्रश्नांची उत्तरं द्यावीत. देवेंद्र फडणवीसांनी सत्तेत असताना आरक्षणाचा मुद्दा रेटून नेला. मग तुम्हाला का जमत नाही?,’ असा सवाल उदयनराजेंनी उपस्थित केला.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!