मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री कंगना रानौतचे मागील काही दिवसांपूसन राजकीय वाद चालू आहेत. या वादादरम्यान कंगणाच्या कार्यालयावर बीएमसीने कारवाई केली होती कंगनाचे कार्यालय तोडण्यात आले होते. सप्टेंबरमध्ये सुशांत सिंग राजपूत प्रकरण आणि कंगनाचे महाराष्ट्र सरकारवर टीका यावरून महाराष्ट्रातील वातावरण तापले होते. या रागातूनच ही कारवाई केल्याचा आरोप कंगनाने केला होता.
या कारवाईविरोधात कंगनाने मुंबई उच्च न्यायालयाचे दार ठोठावले होते. उच्च न्यायालयाने आज याप्रकरणी बीएमसीची ही कारवाई अवैध ठरवली आहे. ‘महापालिकेने बजावलेली नोटीस आणि त्यानंतर तोडकामाचा काढलेला आदेश दोन्ही रद्दबातल करतानाच, ते कार्यालय महापालिकेला पूर्ववत करून द्यावे लागेल,’ असंही न्यायालयानं फटकारलं आहे.
त्यामुळे भाजपने देखील मुंबई महापालिकेसह राज्य सरकारवर टीकास्त्र सोडलं असतानाच मुंबई महापालिकेच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी मात्र, ‘मुंबई महापालिकेने केलेली कारवाई महापालिकेच्या नियमानुसारच केली आहे. मी अद्याप कोर्टाने दिलेला निकाल वाचलेला नाही. तो वाचल्यानंतरच अधिक स्पष्टता येईल’ असं सांगितलं आहे.
महत्वाच्या बातम्या
- मोदी संविधान बदलणार आहेत असा खोडसाळ आरोप कोणी करू नये : आठवले
- ‘माझा सामना, माझी मुलाखत’; हिंदुत्व असेल तर ते दिसत का नाही? : मनसे
- कोरोनाचा धोका वाढला : आंतरराष्ट्रीय विमानसेवा 31 डिसेंबरपर्यंत बंदच
- या सरकारच्या काळात अनेक नैसर्गिक आपत्ती, हे सरकार लवकरच कोसळणार; भाजपच्या माजी मंत्र्याचे भाकित!
- कोरोना काळात अत्यावश्यक सेवा देणाऱ्यांचे बाईडन दांपत्याने मानले आभार ..
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

