Share

कोरोनाची दुसरी लाट आली तर महाराष्ट्रातील सर्वांनाच महागात पडेल, राजेश टोपेंचा इशारा

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : कोरोनाची दुसरी लाट आली तर महाराष्ट्रातील सर्वांना महागात पडेल, असा इशारा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिला आहे. महाराष्ट्रात दुसरी लाट येवू नये असं मला वाटतं पण मनाला भिती वाटते. मुंबईत सुद्धा कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत थोडी थोडी वाढ होतेय. महाराष्ट्रातल्या जनतेने केरळ आणि दिल्लीचा बोध घेतला पाहिजे, असं वक्तव्य आरोग्य मंत्री राजेश टोपेंनी केले आहे.

दरम्यान, राज्यात गुरुवारी ५,५३५ नवीन रुग्णांची नोंद झाली असून, कोरोना बाधित रुग्णांची संख्या १७,६३,०५५ झाली आहे. राज्यात ७९,७३८ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यात १५४ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून, मृतांची संख्या ४६,३५६ वर पोहोचली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.६३ टक्के एवढा आहे.

राज्यात १५४ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली. यामध्ये मुंबई १२, ठाणे १३, वसई-विरार मनपा १४, नाशिक ८, पुणे ६, पिंपरी-चिंचवड मनपा ४, सोलापूर २५, सातारा १२, अमरावती ६, नागपूर ७ आणि अन्य राज्य १ यांचा समावेश आहे. नोंद झालेल्या १५४ मृत्यूंपैकी ६० मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ३९ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित ५५ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे ५५ मृत्यू सोलापूर १५, ठाणे १२, पालघर ७, अमरावती ५, सातारा ५, नाशिक ३, पुणे ३, जळगाव २, औरंगाबाद १, सांगली १ आणि मध्य प्रदेश १ असे आहेत.

गुरुवारी ५,८६० रुग्ण बरे होऊन घरी सोडण्यात आले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण १६,३५,९७१ करोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९२.७९ टक्के एवढे झाले आहे. आतापर्यंत तपासण्यात आलेल्या ९९,६५,११९ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १७,६३,०५५ (१७.६९ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ५,६०,८६८ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ४,२८४ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!