Share

मुंबईतील वीजपुरवठा खंडित होण्यामागे घातपात किंवा सायबर हल्ला नसल्याचे चौकशीत स्पष्ट

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : यंदा संपूर्ण देश कोरोनाच्या संकटातून जात आहे. अशातच राज्यात परतीचा पाऊस, कीड, अतिवृष्टी, आदी संकटांची भर पडत आहे. तर, नुकतीच अवघी मुंबई वीजसंकटात सापडल्याच पाहायला मिळालं. यातच काही दिवसांपूर्वी मुंबईसह उपनगरामध्ये अचानक वीज पुरवठा खंडित झाला होता. त्यामुळे लोकल सेवाही ठप्प झाली. सर्वसामान्य लोकांपासून ते जवळपास सर्वच क्षेत्रांना याचा मोठा फटका बसल्याचे चित्र पाहायला मिळाले होते.

मुंबईसह उपनगरांमध्ये १२ ऑक्टोबर रोजी वीजपुरवठा खंडित झाला होता.दरम्यान, यानंतर वीज पुरवठा खंडित होण्याबाबत राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी धक्कादायक ट्विट केलं.सर्किटमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यानं वीज गेल्याचं ऊर्जामंत्र्यांसह महापारेषणच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं होतं. मात्र, वीज पुरवठा खंडित झाल्या प्रकरणात ऊर्जामंत्र्यांनी ट्विट करत नवी खळबळ उडवून दिली .

“सोमवार दिनांक १२.१०.२०२० रोजी मुंबई, नवी मुंबई व ठाणे येथील संपूर्ण वीज पुरवठा खंडित होण्यामागे घातपाताची शक्यता नाकारता येत नाही,” असं ट्विट ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी केलं आहे. त्यांच्या या ट्विटनंतर उलटसुलट चर्चा सुरु झाल्या होत्या.

दरम्यान, आता या संदर्भात कोणताही घातपात किंवा सायबर हल्ला झाला नसल्याचा निर्वाळा चौकशी समितीने आपल्या अहवालात दिला आहे. तांत्रिक बाबींमुळे वीज पुरवठा खंडित झाल्याचे यात स्पष्ट करण्यात आले आहे. आयआयटी मुंबईचे विद्युत अभियांत्रिकी शाखा विभाग प्रमुख प्रा. बी. जी. फर्नांडिस यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आली होती.हिंदुस्थान समाचारने यासंदर्भात वृत्त दिले आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!