🕒 1 min read
नाशिक : परिवहन खात्यासाठी राज्य सरकारने काही दिवसांपूर्वी पॅकेज दिलं तर मग वीजबिलात सरकार का दिलासा देऊ शकत नाही? यासाठी भाजप, मनसेसह इतर पक्षांनी आक्रमक भूमिका घेत राज्य सरकारवर हल्लाबोल चढवला आहे. ऊर्जा खातं काँग्रेस पक्षाकडे तर परिवहन खातं शिवसेनेकडे असल्याने हा दुजाभाव होत असल्याचा आरोप देखील करण्यात आला.
याच पार्श्वभूमीवर, काँग्रेसच्या खात्यांवर अन्याय होतोय ही आमची भावना आहे. मुख्यमंत्र्यांकडे आम्ही तक्रार केली आहे. तर, सरकार आर्थिक अडचणीत आहे. दर महिन्याला 12 हजार कोटींचं कर्ज काढावं लागतंय, असं विधान काँग्रेस प्रदेशाध्यक्ष व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केलं होतं.
यानंतर आज त्यांनी याबाबत थोरातांनी अधिक भाष्य करत खुलासा केला आहे. ‘कोरोनावर खर्च होत असल्यामुळे सरकारी तिजोरीतील निधी कमी पडतो. सध्या पैशांची आवकही कमी आहे आणि खर्च जास्त आहेत. त्यामुळे काही खात्यांना निधी कमी पडत असल्याचे’ त्यांनी स्पष्ट केलं.
राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या तुलनेत काँग्रेसला मान-सन्मान दिला जात नाही अशा चर्चा सुरु होत्या. याआधी देखील काँग्रेस मंत्र्यांसह काही आमदारांची नाराजी असल्याचे समोर आले होते. मात्र, यासर्व चर्चांमधील तथ्य फेटाळून लावत, ‘आमच्यात काही वाद नाहीत, काँग्रेस पक्षही कोणावर नाराज नसल्याचे’ देखील त्यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘फडणवीसांना उठाबशा काढू द्या, आम्ही चितपट करू; जयंत पाटलांनी ठोकला शड्डू
- प्रार्थनास्थळं उघडल्यामुळेच करोना रुग्ण वाढले; शिवसेनेच्या महापौरांचा अजब दावा
- कर्तृत्वान मराठा स्त्री मुख्यमंत्री व्हावी, आशिष शेलारांचं पवारांसमोर वक्तव्य
- वीज बिलाचा प्रश्न राज्यात पेटला असतानाच, नगर जिल्ह्यात एप्रिल महिन्यापासून तब्बल १३२ कोटी रुपयांची थकबाकी!
- आता शाळा सुरु करण्याचा निर्णय स्थानिक प्रशासनाच्या हातात; शिक्षणमंत्री वर्षा गायकवाडांचे आदेश
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

