मुंबई : ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे यांच्या ‘कर्तृत्वान मराठा स्त्रिया’ या पुस्तकाचं राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आलं. या प्रकाशन सोहळ्यात ज्येष्ठ पत्रकार ज्ञानेश महाराव यांनी आशिष शेलार यांचा उल्लेख भावी मुख्यमंत्री म्हणून केला आहे. शरद पवार यांच्या उपस्थितीत शेलारांचा उल्लेख भावी मुख्यमंत्री असा केल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधान आले आहे.
दरम्यान, आशिष शेलार यांनी कतृत्वान मराठा स्त्री महाराष्ट्राची मुख्यमंत्री व्हावी, या भावनेला समर्थन असल्याचे सांगितले. ज्येष्ठ पत्रकार ज्ञानेश महाराव यांनी आशिष शेलार यांना भावी मुख्यमंत्री संबोधले होते. त्यावर शेलार यांनी उत्तर दिले आहे. यावेळी शेलार यांनी पवारांसमोरच कर्तृत्वान मराठा स्त्री राज्याची मुख्यमंत्री व्हावी अशी अपेक्षा व्यक्त केली. “संदर्भ पुन्हा अनचॅलेंज राहू नये म्हणून, जर विषय मुख्यमंत्रिपदाचा असेल, तर पवारसाहेब, कर्तृत्त्ववान मराठा स्त्री महाराष्ट्राची मुख्यमंत्री व्हावी, अशी अपेक्षा बाळागणारा समाजात मोठा वर्ग आहे, त्याला माझ्यासारख्या माणसाचं सुद्धा समर्थन असू शकतं,” असं शेलार यांनी सांगितलं.
यावेळी शेलार यांनी या पुस्तकाच्या अनुषंगाने लढवय्या मराठा स्त्रियांच्या संघर्षाचा आढावा घेतला. एखाद्या व्यक्तीने पीएचडी करावं आणि त्यावर मुंबई विद्यापीठात संशोधन व्हावं, असं हे पुस्तक असल्याचं शेलार म्हणाले. तसेच चोरमारे यांनी हे पुस्तक सावित्रीबाई फुलेंना अर्पण करून या पुस्तकातून एका जातीचं उदात्तीकरण करण्यात आल्याच्या मानसिकतेलाही छेद दिल्याचा उल्लेख त्यांनी केला.
महत्वाच्या बातम्या
- ‘फडणवीसांना उठाबशा काढू द्या, आम्ही चितपट करू; जयंत पाटलांनी ठोकला शड्डू
- प्रार्थनास्थळं उघडल्यामुळेच करोना रुग्ण वाढले; शिवसेनेच्या महापौरांचा अजब दावा
- कर्तृत्वान मराठा स्त्री मुख्यमंत्री व्हावी, आशिष शेलारांचं पवारांसमोर वक्तव्य
- वीज बिलाचा प्रश्न राज्यात पेटला असतानाच, नगर जिल्ह्यात एप्रिल महिन्यापासून तब्बल १३२ कोटी रुपयांची थकबाकी!
- आता शाळा सुरु करण्याचा निर्णय स्थानिक प्रशासनाच्या हातात; शिक्षणमंत्री वर्षा गायकवाडांचे आदेश
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

