🕒 1 min read
मुंबई : मुंबईत कराची नावाने सुरू असणाऱ्या उद्योगांबद्दल शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आक्षेप घ्यायला सुरुवात केलेली आहे. बांद्रा इथल्या ‘कराची स्वीट्स’ या दुकानावर शिवसेनेच्या वतीने आक्षेप घेतलाय तर याच परिसरातील ‘कराची बेकरी’ या नावावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आक्षेप घेत आज आंदोलनही केलं. कराची नावाने सेना आणि मनसे या दोघांमध्ये आता श्रेय वादाचं राजकारण पेटले आहे.
अशातच, शिवसेनेचे नेते व खासदार संजय राऊत यांनी ट्विट करून बेकरीचे नाव बदलण्याची भूमिका ही पक्षाची अधिकृत नसल्याचं म्हटलं आहे. ‘कराची बेकरी आणि कराची स्वीटस 60 वर्षापासून मुंबई सह देशात आहेत. तयांचा पाकिस्तानशी सबंध नाही. निर्वासित सिंधी पंजाबी बांधवांनी कष्टातून ऊभा केलेला हा व्यवसाय आहे. कराची बेकरीचे नाव बदला ही मागणी निरर्थक आहे. ही शिवसेनेची अधिकृत भुमिका नाही.’ असा खुलासा संजय राऊत यांनी केला आहे.
कराची बेकरी आणि कराची स्वीटस 60 वर्षापासून मुंबई सह देशात आहेत. तयांचा पाकिस्तानशी सबंध नाही. निर्वासित सिंधी पंजाबी बांधवांनी कष्टातून ऊभा केलेला हा व्यवसाय आहे.कराची बेकरीचे नाव बदला ही मागणी निरर्थक आहे.
ही शिवसेनेची अधिकृत भुमिका नाही.— Sanjay Raut (@rautsanjay61) November 19, 2020
मुंबईतील कराची बेकरीच्या नावाला शिवसेनेच्या नितीन नांदगावकरांनी आक्षेप घेतला आहे. वांद्रे येथील कराची बेकरीचं नाव बदला, अशी मागणी नांदगावकरांनी केली आहे. नांदगावकर यांच्या मागणीला शिवसेनेचं समर्थन आहे का? असा प्रश्न सध्या उपस्थित करण्यात येत होता. कराची हे नाव पाकिस्तानमधील आहे आणि या नावामुळे आपल्या सैनिकांचा अपमान होतोय, असं सांगत कराची बेकरीचं नाव बदलण्याची मागणी नितीन नांदगावकरांनी केली आहे.
काय म्हणाले होते शिवसेना नेते नितीन नांदगावकर ?
‘मुंबई आणि महाराष्ट्रात कराची नावाने कोणतेही व्यवसाय चालणार नाहीत. यामुळे पाकिस्तानला तुम्ही एकप्रकारे पाठिंबा देत असल्याचं निदर्शनास येतं. महाराष्ट्रात राहायचं असेल, तर असं नाव चालणार नाही.’ यासंदर्भात नितीन नांदगावकर काही बेकरीच्या मालकांशी बोललेले असून सुरुवातीला त्यांनी विनंती केली आहे. तसेच काही बेकरीच्या मालकांनी नितीन नांदगावकरांच्या या मागणीला मान्यता देत आम्ही हे नाव काढू असंही सांगितलं आहे. या मालकांनी आणि नितीन नांदगावकर यांनी आणि या सेंटर्सच्या मालकांनी दिल्ली आणि हैदराबाद येथील सेंटर्सवर पत्रव्यवहार केला आहे.
महत्वाच्या बातम्या
- मोठी बातमी : राष्ट्रवादीचे नेते व माजी मंत्री एकनाथ खडसेंना कोरोनाची लागण !
- ‘…तर भाजपने पब्लिक राड्यात सामील व्हावं’; भाजपच्या समर्थनावर नांदगावकरांची प्रतिक्रिया
- ‘आता पवारांच्या शब्दाला राज्य सरकारमध्ये किंमत उरली नाही’
- ‘भाजपच्या अकार्यक्षमतेमुळे महावितरणची थकबाकी 37 हजार कोटींनी वाढली’
- ‘काँग्रेसकडे असणाऱ्या खात्यांना निधी तर नाहीच पण इज्जत सुद्धा दिली जात नाही’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

