🕒 1 min read
मुंबई – माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी भाऊबीजेच्या दिवशी एक गाणं पोस्ट केलं आहे. तसेच सगळ्या भाऊरायांना एक मागणं केलं आहे.भाऊबीजेला माझ्या सर्व भावांना एकच मागणं आहे. तिला शिकू द्या. जगण्याचा हक्क तिलाही घेऊ द्या. समाज भक्कम करायचा असेल तर तिला आधी सक्षम होऊ द्या, असं अमृता फडणवीस म्हणाल्यात.
अमृता फडणवीस यांनी त्यांचं नवं गाणं स्त्रियांना समर्पित केलं आहे. दिवाळीच्या शुभेच्छा देताना त्यांनी स्त्री शक्तीचं महत्व पटवून दिलं आहे. या गाण्याच्या व्हिडीओत अमृता फडणवीस यांनी त्यांचा आणि त्यांच्या मुलीचाही फोटो वापरला आहे.
अमृता फडणवीस यांनी हे गाणं ट्विटर आणि फेसबुकवर पोस्ट करताच त्यांच्या या गाण्यावर अनेक प्रतिक्रियाही येत आहेत. काही नेटकऱ्यांनी हे गाणं आवडल्याचं म्हटलं आहे. काही नेटकऱ्यांनी टीका केली आहे.
दरम्यान, प्रसिद्ध दिग्दर्शक, निर्माता महेश टिळेकर यांनी फडणवीस यांच्या गाण्याची टर उडवली आहे. ‘गायी म्हशीच्या हंबरण्याचा आवाज एकवेळ लोक सहन करतील पण हा आवाज सहन होत नाही’, असं म्हणत त्यांनी अमृत फडणवीस यांना खरंच गाता येतं का? सवाल केला आहे.
Thank you so much for appreciating the Womens’ song- tila jagu dya with views touching 10 lakh in 2 days ! I welcome both appreciation and criticism from you – will soon come back with something new for you !
— AMRUTA FADNAVIS (@fadnavis_amruta) November 17, 2020
तिला जगू या गाण्याला लोकांनी दिलेल्या प्रतिसादाबद्दल अमृता फडणवीस यांनी ट्वीट करुन आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्या म्हणतात, ‘महिलांवर आधारित तिला जगू द्या या गाण्याला दिलेल्या प्रतिसादासाठी मी सर्वांचे आभार मानते. दोन दिवसांत या गाण्याला दहा लाख व्ह्यूज मिळाले. कौतुक आणि टीका दोघांचही मी स्वागत करते. तुमच्यासाठी नवीन काहीतरी घेऊन येईन’.
महत्वाच्या बातम्या
- ‘सुरज पे मंगल भारी’ हा चित्रपट पाहायला गेलेल्या आमिरवरच नेटकरी झाले भारी!
- ‘करोनाच्या नावाखाली तुम्ही जनतेला लुटले, वाढीव वीजबिल हा सरकार पुरस्कृत मोठा घोटाळा’
- ‘गायी म्हशीच्या हंबरडण्याचा आवाज एकवेळ लोक सहन करतील पण या गायिकेचा आवाज…’
- माहेरची सरती दिवाळी….सोनालीची भावुक पोस्ट
- भारताने पुन्हा एकदा विश्वगुरू बनण्याच्या आकांक्षा ठेवली पाहिजे- उपराष्ट्रपती
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
