🕒 1 min read
मुंबई : टाळेबंदीमुळे सर्वसामान्य जनतेचे कंबरडे मोडले असताना आता ठाकरे सरकारने वाढीव वीजबिलात कोणत्याही प्रकारची सवलत देण्यास नकार दिला आहे. वीज ग्राहकांना वीज बिलात सवलत मिळणार नसल्याची माहिती ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी दिली आहे. दोन दिवसांपूर्वी महावितरणने वीज बिल वसुलीबाबत आदेश काढले होते, त्यावर बोलताना ऊर्जामंत्र्यांनी हे स्पष्ट केलं आहे.
राज्यातील वीज ग्राहकांना वाढीव वीज बिलातून दिलासा मिळणार नाही, मीटर रिडींगप्रमाणे आलेली बिलं ग्राहकांनी भरलीच पाहिजेत असं राऊत यांनी स्पष्ट केलं आहे. ६९ टक्के वीज बिल वसुली पूर्ण झाली आहे, आता सवलतीचा विषय बंद झाला आहे. महावितरण ६९ हजार कोटीच्या तोट्यात आहे, आम्ही आता कर्ज काढू शकत नाही. महावितरणला आता वीज बिल वसुलीचे आदेश देण्यात आले आहेत.
यावरून आता मनसेने आक्रमक भूमिका घेतली आहे. वीजबिल न भरल्याने वीज कापायला येणाऱ्या अधिकाऱ्यांना मनसे स्टाइलनं शॉक देऊ, असा इशाराच मनसेचे ठाणे-पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी दिला आहे.लॉकडाउनदरम्यान जनतेला आलेलं वाढीव वीजबिल माफ व्हावं यासाठी आम्ही अनेक आंदोलनं केली. काहीवेळा आमच्या कार्यकर्त्यांनी कायदाही हातात घेतला. पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांनाही याबाबत पत्र लिहीलं. पण त्यावर अद्याप काहीच तोडगा निघालेला नाही.
पुढे बोलताना जाधव म्हणाले, ऊर्जामंत्र्यांनी वीजबिल माफ होणार नाही असं जाहीर केलं. जर लोकांकडून बळजबरीनं वीजबिल घेतलं जाणार असेल तर तुमची गाठ मनसेशी आहे हे लक्षात ठेवा’, असं अविनाश जाधव यांनी म्हटलं आहे.आता वीज खंडित करायला आले तर तुम्हाला जनतेच्या आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या रोषाचा सामना करावा लागेल असं देखील त्यांनी म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या
- राष्ट्रवादीच्या नेत्यांना वाचवण्यासाठी सरकारची धडपड सुरु आहे – राम कदम
- ‘करोनाच्या नावाखाली तुम्ही जनतेला लुटले, वाढीव वीजबिल हा सरकार पुरस्कृत मोठा घोटाळा’
- ‘गायी म्हशीच्या हंबरडण्याचा आवाज एकवेळ लोक सहन करतील पण या गायिकेचा आवाज…’
- माहेरची सरती दिवाळी….सोनालीची भावुक पोस्ट
- भारताने पुन्हा एकदा विश्वगुरू बनण्याच्या आकांक्षा ठेवली पाहिजे- उपराष्ट्रपती
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
