Share

आम्ही सगळं आयुष्य मज्जीदमध्ये घालवू पण राम कोणी मनातून काढू शकणार नाही ; कंगणा रनौत

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : बॉलीवूड अभिनेत्री कंगणा रनौत नेहमीच सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असते. कंगना नेहमीच आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे अडचणीत सापडते. कंगणा तिच्या बेधडक बोलण्यामुळे नेहमीच चर्चेत राहिली आहे. आपल्या परखड विधानांसाठी चर्चेत राहणारी कंगना राणौतचे एक ट्विट सध्या प्रचंड व्हायरल होते आहे.

बांगलादेशी क्रिकेटपटू शाकिब अल हसन मागच्या आठवड्यात कोलकाता येथे कालीमातेच्या पूजेला उपस्थित होता. या घटनेची माहिती जाहीर झाल्यानंतर बांगलादेशमधील कट्टर अथवा कडव्या विचारांच्या मुस्लिमांनी नाराजी व्यक्त केली होती. शाकिबला जीवे मारण्याच्या धमक्या येऊ लागल्या होत्या. हे प्रकरण चिघळत असल्याचे पाहून शाकिबने माफी मागून विषय संपवण्याचा प्रयत्न केला होता. आता बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौतने यावर प्रतिक्रिया दिली आहे.

कंगनाने एक न्यूज रीट्वीट करत या संपूर्ण प्रकरणावर कमेंट केली. ‘मंदिरांना इतके का घाबरता? काही तर कारण असेन, उगाच कोणी इतके घाबरत नाही. आम्ही तर अख्खे आयुष्य मशिदीत घालवू पण आमच्या हृदयावर कोरलेले रामाचे नाव कोणी मिटवू शकत नाही. स्वत:च्या पूजेवर विश्वास नाही की, तुमचा भूतकाळ तुम्हाला मंदिरांकडे आकर्षित करत आहे. विचारा स्वत:ला… ‘असे कंगना म्हणाली.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!